मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

फळांवर थुंकी लावून विकणाऱ्याचा VIDEO व्हायरल, पोलिसांनी केली कडक कारवाई

फळांवर थुंकी लावून विकणाऱ्याचा VIDEO व्हायरल, पोलिसांनी केली कडक कारवाई

एक फळ विक्रेत्याने फळाला थुंकी लावत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक खूप सावध झाले आहेत.

  • Published by:  Manoj Khandekar

रायसेन, 05 एप्रिल : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे एककीकडे देशात हाहाकार माजला आहे. पण असंताना रायसेनचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एक फळ विक्रेत्याने फळाला थुकी लावत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक खूप सावध झाले आहेत. कोणतीही वस्तू बघून खरेदी करा असे मेसेज व्हायरल होत आहे. इतकंच नाही तर यातून जातीय वादही पेटलेला दिसला.

दरम्यान, या प्रकरणी रायसेन पोलिसांनी फळ विक्रेत्याविरूद्ध एफआयआर नोंदविला आहे. एसपी मोनिका शुक्ला म्हणाल्या की, 'हा व्हिडिओ जुना आहे आणि आम्ही या संदर्भात योग्य ती कारवाई करीत आहोत. कोणालाही याची चिंता करण्याची गरज नाही.' प्रत्येकाच्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ आहे. यावर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झाला

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये हँडकार्टवर फळांची विक्री करणारी व्यक्ती दिसली आहे. ज्यामध्ये तो प्रत्येक फळ उचलतो आणि आपल्या बोटावर थुंकी लावतो. काही लोक या व्हिडिओला आताचा म्हणत आहेत, त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता आहे. पोलिसांना याची माहिती मिळताच तपासणीनंतर हा व्हिडिओ जुना असल्याचे दिसून आले आणि पोलिसांनी गुन्हा नोंदवून फळ विक्रेत्याचा शोध सुरू केला आहे.

First published:

Tags: Corona