चंदीगड, 14 मार्च : भारतात (India) कोरोनाव्हायरस (Coronavirus) रुग्णांची संख्या वाढते आहे, देशात हा विषाणू जास्त पसरू नये, यासाठी परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची सर्व विमानतळांवर तपासणी होते आहे. अशात कोरोनाव्हायरसने संक्रमित असलेल्या देशांमधून आलेले तब्बल 335 लोकं बेपत्ता आहे. महत्त्वाचं म्हणजे या लोकांची स्क्रिनिंग झालेली नाही, त्यामुळे धोका अधिकच वाढला आहे. पंजाबमध्ये (Punjab) परदेशातून आलेल तब्बल 335 जण बेपत्ता आहे, अशी माहिती पंजाबच्या आरोग्य विभागानं दिली आहे. एएनआयने (ANI) याबाबत ट्विट केलं आहे.
Health & Family Welfare Department, Punjab: 335 passengers with history of travel to #COVID19 affected countries are untraceable. A total 6011 passengers have been traced as of yesterday (13th March). pic.twitter.com/0snhRtoTON
— ANI (@ANI) March 14, 2020
पंजाबच्या आरोग्य विभागामार्फत कोविड १९ बाबत मेडिकल बुलेटिन जारी करण्यात आलं आहे. त्यानुसार ज्या ठिकाणी कोरोनाव्हायरस हाहाकार माजवत आहे, अशा देशांमधून राज्यात एकूण 6,696 प्रवासी परतलेत. त्यापैकी 6,011 प्रवाशांची चाचणी झाली आहे. तर 335 लोकं बेपत्ता आहेत. या व्यक्तींचा तपास सुरू असल्याचं राज्य सरकारनं म्हटलं आहे. हे वाचा - कोरोनाची दहशत! नागपुरातील रुग्णालयातून 4 संशयित रुग्ण पळाले, पोलिसांचा शोध सुरू कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. नागपुरात कोरोनाबाबत नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. रुग्णालयातून 4 रुग्ण पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. शुक्रवारी दुपारी मेयो रुग्णालयात चार जणांना दाखल करण्यात आलं होतं. या रुग्णांची चाचणीही करण्यात आली होती. मात्र चाचणीचे रिपोर्ट्स आले नव्हते. चारही जणांनी कोरोनाचा संसर्ग होईल या भीतीनं रुग्णालयातून पळ काढला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चार जणांना कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांसोबत ठेवण्यात आलं होतं. त्यांच्या काही चाचण्याही करण्यात आल्या होत्या. मात्र रिपोर्ट्स न मिळाल्यानं हे चारही रुग्ण कोरोनाच्या भीतीमुळे रुग्णालयातून पळून गेले आहेत. या चारही रुग्णांना शोधून पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. हे वाचा - ‘कोरोना’वर मात केलेल्या रुग्णाला पुन्हा व्हायरसची लागण होऊ शकते का? भारतात आतापर्यंत 2 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर एकूण 83 रुग्ण आहेत. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या 19 वर गेली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अत्यावश्यक सेवा वगळता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिमखाना, चित्रपटगृह बंद ठेवण्यात येणार आहेत. तर गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

)







