मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

'कोरोना'वर मात केलेल्या रुग्णाला पुन्हा व्हायरसची लागण होऊ शकते का?

'कोरोना'वर मात केलेल्या रुग्णाला पुन्हा व्हायरसची लागण होऊ शकते का?

कोरोनाव्हायरसमधून (Coronavirus) बऱ्या झालेल्या व्यक्तीच्या शरीरात 2 आठवड्यांपर्यंत हा व्हायरस असू शकतो, मात्र रोगप्रतिकारक शक्ती त्यावर मात देण्यासाठी तयार असते.

कोरोनाव्हायरसमधून (Coronavirus) बऱ्या झालेल्या व्यक्तीच्या शरीरात 2 आठवड्यांपर्यंत हा व्हायरस असू शकतो, मात्र रोगप्रतिकारक शक्ती त्यावर मात देण्यासाठी तयार असते.

कोरोनाव्हायरसमधून (Coronavirus) बऱ्या झालेल्या व्यक्तीच्या शरीरात 2 आठवड्यांपर्यंत हा व्हायरस असू शकतो, मात्र रोगप्रतिकारक शक्ती त्यावर मात देण्यासाठी तयार असते.

  • Published by:  Priya Lad

नवी दिल्ली, 14 मार्च : चीनच्या (China) वुहानमधून (Wuhan) पसरलेल्या कोरोनाव्हायरसने (Coronavirus) 120 पेक्षा जास्त देशांना आपल्या विळख्यात घेतलं आहे. 1.34लाख लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे, ज्यापैकी 4,984 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हजारो रुग्ण बरेदेखील झालेत. भारतातही 10 रुग्ण बरे झालेत. मात्र आता प्रश्न असा आहे, की या व्हायरसवर मात केलेल्या रुग्णांना पुन्हा कोरोनाव्हायरस होऊ शकतो का? आणि ती व्यक्ती इतरांना आजारी पाडू शकते का?

अमेरिकेतल्या टेम्पल युनिव्हर्सिटीच्या (Temple University) संशोधकांनी हा अभ्यास केला. या एपिडेमिओलॉजिस्ट (Epidemiologist) क्रिस जॉनसन यांनी सांगितलं की संक्रमित व्यक्ती बरा झाल्यानंतर 2 आठवड्यांपर्यंत त्याच्या शरीरात व्हायरस असू शकतो.

संबंधित - कोण आहे ‘कोरोना’चा पहिला रुग्ण? ज्याच्यामुळे जगभर पसरला महाभंयकर व्हायरस

मात्र हा व्हायरस जर आपल्या शरीराला कोणतीही हानी पोहोचवत नसेल, तर तर आपलं शरीर त्याला प्रतिरोध करण्यासाठी तयार होतं. असं झाल्यास आपल्याला पुन्हा तो व्हायरस होत नाही, कारण आपली रोगप्रतिकारक शक्ती त्याचा सामान सहजरित्या करते.

वुहानच्या 4 मेडिकल प्रोफेशनल्सवर संशोधन

जामा जर्नलमध्ये प्रकाशित संशोधनानुसार, संशोधकांनी 30 ते 36 वयोगटातील 4 मेडिकल प्रोफेशनल्सवर अभ्यास केला. हे चौघंही COVID-19 ने संक्रमित होते. वुहान युनिव्हर्सिटीच्या रुग्णालयात त्यांच्यावर 1 जानेवारी ते 14 फेब्रुवारीदरम्यान उपचार झाले. उपचारानंतर हे चौघंही ठिक झाले. उपचारादरम्यान त्यांना अँटिव्हायरल औषध टॅमीफ्लू देण्यात आलं. उपचारानंतर त्यांच्यामधील लक्षणं कमी झाली आणि वैद्यकीय चाचणी त्यांचा रिपोर्ट कोरोना नेगेटिव्ह आला. या डॉक्टरांना काही दिवस घरात राहण्यास सांगण्यात आलं. चौघांच्याही घशात 5 ते 13 दिवस सूज होती, घसा खवखवत होता. आणि त्यानंतर केलेला कोरोनाव्हायरस टेस्ट पॉझिटिव्ह आला. याचा अर्थ व्हायरसची लक्षणं दिसली नाही, तरी त्यांच्या शरीरात हा व्हायरस 13 दिवस होता.

संबंधित - कोरोनापासून बचावासाठी 'मास्क'चा जुगाड! पाहा ‘हा’ व्हिडीओ

जॉनसन यांनी सांगितलं की, जपानमध्येही एक महिला पूर्णपणे बरी झाली. काही दिवसांनंतर ती पुन्हा आजारी पडली. क्रिस यांनी सांगितलं की, डॉक्टरांना याचं कारण अद्याप समजलेलं नाही. कदाचित ही महिला एखाद्या कोरोनाव्हायरस असलेल्या रुग्णाच्या संपर्कात आल्याने पुन्हा आजारी पडली असावी. किंवा तिची रोगप्रतिकारक शक्ती व्हायरसशी पूर्णपणे लढली नसावी.

मिशिगन टेक युनिव्हर्सिटीमधील व्हायरोलॉजिस्‍ट (Virologist) एबनेजर टंबन यांच्या मते, रिकव्हरीनंतरही व्हायरस शरीरात असणं नवीन नाही. झिका (Zika Virus) आणि एबोला (Ebola Virus) हे व्हायरस रुग्ण बरा झाल्यानंतरही कित्येक महिने रुग्णाच्या शरीरात असल्याचं दिसून आलं आहे.

व्हायरसवर मात केलेल्या चीनमधील मेडिकल प्रोफेशनल्सबाबत टंबन यांनी सांगितलं की, कदाचित टॅमीफ्लूमुळे त्यांच्या शरीरातील व्हायरसची संख्या इतकी कमी झाली असावी, की ती ओळखण्यासाठी आपल्याकडे योग्य असं तंत्रज्ञान उपलब्ध नाही किंवा उपचार बंद केल्यानंतर शरीरात पुन्हा व्हायरसची संख्या हळूहळू वाढणं सुरू झालं असावं.

बरं झाल्यानंतर खबरदारी घ्यावी

या मेडिकल प्रोफेशनल्सच्या नातेवाईकांमध्ये व्हायरस नेगेटिव्ह होता. चौघंही मेडिकल प्रोफेशनल्स आहेत. त्यामुळे व्हायरस पसरू नये, यासाठी त्यांनी आवश्यक ती सर्व काळजी घेतली.

जॉनसन यांच्या मते, एकदा या आजारातून एखादी व्यक्ती बरी झाली, त्यानंतर त्यांची रोगप्रतिकारक शक्ती संक्रमणापासून वाचण्यासाठी तयार होते. याचाच अर्थ त्यांच्यावर इन्फेक्शनचा प्रभाव फारसा होत नाही.

टंबन यांनी सांगितलं की, बरं झालेल्या रुग्णांनीही काळजी घ्यायला हवी. हात मिळवू नये, कुणाशी जास्त संपर्कात येऊ नये. खोकला आला नाही, शिंक आली नाही, तरीही वारंवार हात धुत राहावेत. त्यांच्या शरीरात व्हायरसचं प्रमाण कमी असेल तर खाणंपिणं शेअर केल्यानं इतरांना हा आजार होणार नाही.

संबंधित - Coronavirus आधी 'या' महाभयंकर आजारांमुळेही जगभरात लागू झाली होती हेल्थ एमर्जन्सी

First published:

Tags: Corona virus in india, Coronavirus symptoms