कोरोनाची दहशत! नागपुरातील रुग्णालयातून 4 संशयित रुग्ण पळाले, पोलिसांचा शोध सुरू

कोरोनाची दहशत! नागपुरातील रुग्णालयातून 4 संशयित रुग्ण पळाले, पोलिसांचा शोध सुरू

या संशयित रुग्णांना कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांसोबत ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे आपल्यालाही कोरोना होईल असा दावा या रुग्णांनी केला आहे.

  • Share this:

नागपूर, 14 मार्च : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. नागपुरात कोरोनाबाबत नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. रुग्णालयातून 4 रुग्ण पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. शुक्रवारी दुपारी मेयो रुग्णालयात चार जणांना दाखल करण्यात आलं होतं. या रुग्णांची चाचणीही करण्यात आली होती. मात्र चाचणीचे रिपोर्ट्स आले नव्हते. चारही जणांनी कोरोनाचा संसर्ग होईल या भीतीनं रुग्णालयातून पळ काढला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार य़ा चार जणांना कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांसोबत ठेवण्यात आलं होतं. त्यांच्या काही चाचण्याही करण्यात आल्या होत्या. मात्र रिपोर्ट्स न मिळाल्यानं हे चारही रुग्ण कोरोनाच्या भीतीमुळे रुग्णालयातून पळून गेले आहेत. या चारही रुग्णांना शोधून पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.

क्रिकेटविश्वाला फटका! IPL खेळणाऱ्या गोलंदाजाला कोरोनाचा धोका

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिमखाना, चित्रपटगृह बंद ठेवण्यात येणार आहेत. तर गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे. आता ही संख्या 19 वर गेली आहे पुण्यातल्या रुग्णांची संख्या 10वर गेली असून नागपूरातही आणखी दोन जणांची चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. पुण्यात 311 जणांना देकरेखीखाली ठेवण्यात आलं आहे.

भारतात आतापर्यंत 2 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ‘कोरोना’चा प्रसार दिवसेंदिवस वाढत असल्याने जगभर चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कोरोना आता 100 देशांमध्ये पसरला असून हजारो लोक त्याने ग्रस्त झाले आहेत. तर जगभरात मृत्यू पावलेल्यांची संख्याही वाढत आहेत.

कोरोनाला रोखण्यासाठी भारताकडे आहेत फक्त 30 दिवस, तज्ञांनी दिला इशारा

First published: March 14, 2020, 11:18 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading