भारतात इटलीसारखाच पसरत आहे कोरोना, तरीही देशासाठी आहे दिलासादायक बाब

भारतात इटलीसारखाच पसरत आहे कोरोना, तरीही देशासाठी आहे दिलासादायक बाब

इटलीमध्ये गेल्या महिन्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत आणि मृतांमध्ये वाढ झाली. तर भारतात त्याच प्रमाणात एप्रिलमध्ये रुग्णसंख्या आणि मृतांमध्ये वाढ होत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 09 एप्रिल : भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून आतापर्यंत 5734 लोकांना याची लागण झाली आहे. तर आतापर्यंत 166 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोना रुग्णांची ही आकडेवारी इटलीप्रमाणेच वाढत चालली आहे. यामध्ये समाधानाची बाब म्हणजे वेळेत अंतर आहे. इटलीमध्ये गेल्या महिन्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत आणि मृतांमध्ये वाढ झाली. तर भारतात त्याच प्रमाणात एप्रिलमध्ये रुग्णसंख्या आणि मृतांमध्ये वाढ होत आहे.

जगातील कोरोना व्हायरसच्या आकडेवारीची तपासणी करणाऱ्या वर्ल्डमीटर वेबसाईटनुसार भारतात 1 एप्रिलपर्यंत 1998 केस समोर आल्या होत्या. तर 58 मृत्यू होते. इटलीमध्ये 1 मार्चपर्यंत 1577 प्रकरणं समोर आली होती तर 41 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर इटलीत पुढच्या सात दिवसात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 5883 तर 233 जणांचा मृत्यू झाला. भारतातही 1 एप्रिलनंतर 7 एप्रिलपर्यंत एकूण 5916 रुग्ण आढळले. तर मृतांचा आकडा 160 वर पोहोचला.

भारत आणि इटली यांच्यात दरदिवशी समोर येणाऱ्या आकडेवारीत जास्त अंतर नाही. इटलीत 1 मार्चला 573 रुग्ण तर 41 जणांचा मृत्यू झाला होता. तर भारतात 1 एप्रिलला 601 रुग्ण होते.  तर एकूण 58 लोकांचा मृत्यू झाला होता. दोन्ही देशांचा सुरुवातीचा हा आलेख थोडाफार एकसारखाच दिसत आहे. इटलीमध्ये 1 मार्चपर्यंत कोरोनाचे 33 रुग्ण बरे झाले होते तर भारतात 1 एप्रिलपर्यंत 25 लोक ठणठणीत होऊन घरी परतले होते. त्यानंतरच्या सात दिवसांत भारतात 93 लोक बरे झाले तर इटलीत 66 रुग्ण बरे झाले होते.

हे वाचा : पुणेकरांनो काळजी घ्या! इटलीपेक्षाही अधिक आहे मृत्यूदर

देशाची लोकसंख्या 130 कोटी असताना होत असलेल्या चाचण्या पुरेशा नाहीत. भारतात 6 एप्रिलपर्यंत 85 हजार चाचण्या झाल्या होत्या. म्हणजेच एक लाख लोकांमागे फक्त 6.5 लोकांची चाचणी होत आहे. चाचण्यांचे प्रमाण कमी असल्यानं कोरोनाग्रस्तांची संख्या लवकर समजत नाही. दुसरीकडं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे की, भारतानं योग्य वेळी लॉकडाऊन केलं आहे. यामुळेच भारत अजुनही दुसऱ्या आणि तिसऱ्या स्टेजच्या मध्ये आहे. चीन, अमेरिका आणि य़ुरोपीय देशांच्या तुलनेत कोरोनाचा प्रादुर्भाव भारतात कमी वेगानं पसरत आहे.

हे वाचा : कोरोनापासून कसा कराल बचाव? वुहानमधील भारतीयाने दिला महत्त्वपूर्ण सल्ला

गेल्या एक महिन्यापासून भारतात कोरोना दुसऱ्या स्टेजमध्येच आहे. कम्युनिटी ट्रान्समिशनमध्ये अद्याप पोहोचलेला नाही. अमेरिकेत कोरोनाच्या 1 हजार रुग्णांची संख्या झाल्यानंतर पुढच्या 10 दिवसांत 20 हजारांवर आकडा पोहोचला होता. तसंच इटलीतील रुग्णांची संख्या आणि मृतांच्या प्रमाणापेक्षा भारतात कोरोनामुळे मृतांचे प्रमाण रुग्णांच्या तुलनेत कमी आहे.

हे वाचा : डॉक्टर वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू, तीन मुलांनी व्हिडिओ कॉलवरून घेतलं अंत्यदर्शन

इटलीत सुरुवातीला जसा रुग्णांचा आणि मृतांचा आकडा होता तसाच भारतातही आहे. मात्र तरीही लोकसंख्येच्या तुलनेत भारतात रुग्णसंख्या कमी आहे. तज्ज्ञांकडून याबाबत तीन कारणं सांगितली जात आहे. एक म्हणजे कोरोनाच्या चाचण्या इथं कमी होत आहे. दुसरं कारण लॉकडाऊन लवकर लागू करण्यात आलं. तर तिसरं म्हणजे भारतीयांना देण्यात येणारी बीसीजी लस.

हे वाचा : धक्कादायक: राज्यात एका तासाला एक कोरोनाबाधिताचा मृत्यू, रुग्ण संख्याही वाढली

First published: April 9, 2020, 10:15 PM IST

ताज्या बातम्या