कोरोनापासून कसा कराल बचाव? वुहानमधील भारतीयाने दिला महत्त्वपूर्ण सल्ला

कोरोनापासून कसा कराल बचाव? वुहानमधील भारतीयाने दिला महत्त्वपूर्ण सल्ला

लॉकडाऊनच्या तब्बल 73 दिवसांच्या कालावधीत मी कोणाशी बोलतही नव्हतो. त्यामुळे आता मला नीट बोलताही येत नाही

  • Share this:

वुहान, 9 एप्रिल : चीनमधीन वुहान (Wuhan) या शहरात कोरोनाने (Covid - 19) हाहाकार माजवला होता. तब्बल अडीच महिने तेथे सरकारने लॉकडाऊन ठेवलं होतं. तेथील नागरिकांसाठी हा काळ अतिशय आव्हानात्मक असणार यात शंका नाही.

सध्या तेथील लॉकडाऊन उठवण्यात आल्याने नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. यादरम्यान चीनमध्ये (China) वास्तव्यास असलेल्या एक भारतीय नागरिकाने याकाळातील अनुभव शेअर केले आहे. भारतात जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. मात्र चीनमध्ये यापूर्वीच कोरोनाचं संकट ओढवलं होतं. त्यामुळे इतर देशांची होणारी परिस्थिती पाहता भारताने पटापट यावर पावले उचलत अंमलबजावणी केली. कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंग हा एकमेव पर्याय असल्याचे त्याने सांगितले.

तब्बल 73 दिवस चीनमधील लॉकडाऊन सुरू होता. यावर त्याने सांगितले की, 73 दिवसांपेक्षा अधिक काळ मी माझ्या खोलीत थांबलो होतो. गेल्या अनेक दिवसांपासून कोणाशी बोललं नसल्याने आता मला नीट बोलताही येत नाही. यावेळी परवनाही घेऊन मी माझ्या प्रयोगशाळेत जात होतो, अशी माहिती वुहानमधील हायड्रोबायोलॉजिस्ट म्हणून काम करणारे अरुणजीत टी सार्थजीत यांनी दिली. पीटीआयने हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे. चीनमध्ये अडकलेल्यांना मायदेशी परत आणण्यासाठी एअर इंडियाने दोन विशेष विमानांची सोय केली होती. या विमानांमधून तब्बल 700 जण भारतात परतले. त्यामध्ये सार्थजीतही भारतात परतला आहे.

पावसाळ्यात धोका

भारताने संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू केल्याचा निर्णय योग्य आहे. मात्र पावसाळ्यात अडचणी वाढू शकतात. या काळात लोकांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यावेळी व्हायरस घातक ठरू शकतो, असंही सार्थजीत याने सांगितलं. वुहानमध्ये अत्यंत काटेकोरपणे लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जात होतं. मी 72 दिवस स्वत:ला घरात बंद करुन घेतलं होतं आणि कोरोनापासून बचाव करण्यासाठी हे आवश्यक असल्याचं त्याने सांगितलं.

संबंधित - अंताक्षरीनंतर स्मृती इराणींचा नवा उपक्रम, फोटो टाकून दिलं प्रात्यक्षिक

 

 

संपादन, संकलन - मीनल गांगुर्डे

 

 

First published: April 9, 2020, 9:27 PM IST

ताज्या बातम्या