वॉशिंग्टन, 25 मार्च : कोरोनाने महासत्ता असलेल्या अमेरिकेलाही सोडले नाही आहे. अमेरिकेत आतापर्यंत 55 हजार 233 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर त्यातील 797 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत केवळ 379 लोकं बरी झाली आहे. त्यामुळं कोरोनाचा वाढता प्रसार पाहता अमेरिकेतही लॉक डाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळं सध्या संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था ठप्प पडली आहे. या सगळ्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अजब वक्तव्य केले आहे. ट्रम्प यांच्या मते, “कोरोनामुळे लॉक डाऊन केल्यास लोकं घरात आत्महत्या करतील”, त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावर जगभरातून टीका होत आहे. कोरोनाबाबत माहिती देण्यासाठी ट्रम्प यांनी पत्रकार परिषद घेतली होती, यावेळी ट्रम्प यांनी, पहिल्यांदाच अमेरिकेची अर्थव्यवस्था एका आजारामुळे अडचणीत आली आहे. त्यामुळं अमेरिका बंद राहिल्यास लोक घरात आत्महत्या करतील, असे वक्तव्य केले. तसेच, ऐतिहासिक संकटात सापडले असताना, लोकांनी एकत्र येऊन लढा द्यावा, असे आवाहनही केले. वाचा- काबुलच्या गुरुद्वारामध्ये आत्मघातकी हल्ला, 4 जणांचा मृत्यू ट्रम्प यांचे विधान कोरोनाव्हायरसचे संकट महासत्ता देशाला कशा परिस्थिती आणू शकते याचे उदाहरण आहे. मंगळवारी ट्रम्प यांनी असे वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर विरोधकांनी टीका केली. असोसिएट प्रेसच्या वृत्तानुसार, ट्रम्प यांचा लॉक डाऊन करण्यास विरोध होता. मात्र देशातील परिस्थितीत दिवसेंदिवस चिघळत चालली असताना, त्यांना नाईलजास्तव हा निर्णय घ्यावा लागला. वाचा- देशातील बाजारावर कोरोनाचा मोठा फटका,सोन्याची विक्री गाठणार 25 वर्षातील निच्चांक कोरोनाव्हायरस हा तापासारखा नाही आहे. लोकांनी कधीच अशी परिस्थिती पाहिली नव्हती. त्यामुळे त्याच्याशी दोन हात करण्यासाठी सर्व उपाययोजना करणे आवश्यक आहे. COVID-19चा मृत्यू दर अमेरिकेत कमी आहे. एकूण जगभरात 1 लाखहून अधिक लोक बरे झाले आहेत. मात्र कोरोनामुळे 16 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 175 देशांमध्ये 3 लाख 86 हजार 350 हून अधिक रुग्णांची पुष्टी झाली आहे. वाचा- Fact Check : इटलीच्या रस्त्यावर पडलाय मृतांचा खच? हे आहे व्हायरल फोटोमागचे सत्य
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.