कोरोनामुळे अमेरिकेतही भीषण परिस्थिती, डॉक्टरांसाठी या भारतीया हॉटेलने घेतला कौतुकास्पद निर्णय

कोरोनामुळे अमेरिकेतही भीषण परिस्थिती, डॉक्टरांसाठी या भारतीया हॉटेलने घेतला कौतुकास्पद निर्णय

अमेरिकेमध्ये जे डॉक्टर आणि नर्सेस कोरोना व्हायरसपासून सर्वांचं संरक्षण कऱण्यासाठी अहोरात्र झटत आहेत, त्यांना ओयो हॉटेल्समध्ये मोफत राहता येणार आहे.

  • Share this:

न्यूयॉर्क, 25 मार्च : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) यांची मुलगी आणि वरिष्ठ सल्लागार इव्हांका ट्रम्पने भारतीय स्टार्ट-अप असणाऱ्या ओयो (OYO Hotels) हॉटेल्सच्या एका उपक्रमाचं कौतुक केले आहे. या उपक्रमामध्ये ओयो हॉटेल्सकडून असा निर्णय घेण्यात आला आहे की, अमेरिकेमध्ये जे डॉक्टर आणि नर्सेस कोरोना व्हायरसपासून सर्वांचं संरक्षण कऱण्यासाठी अहोरात्र झटत आहेत, त्यांना ओयोच्या हॉटेल्समध्ये मोफत राहता येणार आहे. इव्हांकाने ओयोच्या या उपक्रमाचं कौतुक केलं आहे. ‘या प्रकारचे परोपकारी प्रभावशाली कृत्य राष्ट्राला आणि आपल्या जग टिकवून ठेवण्यास मदत करतात’ अशा शब्दात ट्वीट करत इव्हांकाने ओयो हॉटेल्सचं कौतुक केलं आहे.

रितेश अग्रवाल या युवकाने ओयो रुम्सची स्थापना केली आहे. आता अनेक देशांमध्ये ओयोने आपली सेवा सुरू केली आहे. त्यांच्याकडून सांगण्यात आले की, कोरोनाशी लढणाऱ्या डॉक्टर, नर्सेस आणि अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी मोफत राहण्याची सोय उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. 24 मार्चपासून हा स्तुत्य उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

(हे वाचा-देशातील बाजारावर कोरोनाचा मोठा फटका,सोन्याची विक्री गाठणार 25 वर्षातील निच्चांक

अमेरिकेत आतापर्यंत 55 हजार 233 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर त्यातील 797 लोकांचा मृत्यू झाला आहे. रोगाचा वाढता प्रसार पाहता अमेरिकेतही लॉक डाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळं सध्या संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था ठप्प पडली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 25, 2020 12:35 PM IST

ताज्या बातम्या