Home /News /national /

जगाला हादरवणाऱ्या कोरोनाला नमवणारा 'भीलवाडा पॅटर्न', टीना डाबीने सांगितलं कसा दिला लढा?

जगाला हादरवणाऱ्या कोरोनाला नमवणारा 'भीलवाडा पॅटर्न', टीना डाबीने सांगितलं कसा दिला लढा?

भीलवाडामध्ये कोरोनाला रोखण्यासाठी काम करणाऱ्या जिल्ह्याच्या प्रशासकीय पथकामध्ये टीना डाबी यांचाही समावेश होता.

    नवी दिल्ली, 10 एप्रिल : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. रुग्णांची आणि मृतांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना एकमेव अपवाद असलेला जिल्हा म्हणजे भीलवाडा. राजास्थानातील भीलवाडाने मात्र नवीन संक्रमण कमी केलं आहे. या जिल्ह्यातील संक्रमणा रोखण्यासाठी केलेल्या उपायांबद्दल माहिती देताना आयएएस अधिकारी टीना डाबी यांनी सांगितलं की, भीलवाडाचं इटली होऊ शकलं असतं. आपल्याकडं रुग्णांची संख्याही तेवढी होती आणि त्याची कम्युनिटी ट्रान्समिशनकडे वाटचाल सुरु झाली असती. भीलवाडामध्ये कोरोनाला रोखण्यासाठी काम करणाऱ्या जिल्ह्याच्या प्रशासकीय पथकामध्ये टीना डाबी यांचाही समावेश होता. त्यांनी सांगितलं की, 'लवकर आणि पूर्णपणे केलेल्या लॉकडाऊनमुळे हे थांबवता आलं. आता आपल्याया याचीच गरज आहे.' या सगळ्याची सुरवात भीलवाडातील एका खासगी रुग्णालयात डॉक्टरांनी केलेली चाचणी पॉझिटिव्ह आढळल्यानंतर झाली होती. त्यानंतर 15 वैद्यकिय व्यवसाय करणाऱ्यांना याची लागण झाल्याचं समोर आलं होतं. हे सर्व टीना डाबी यांच्याकडे असलेल्या कार्यक्षेत्रात होत होतं. 'कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर आम्ही हॉस्पिटलचं रेकॉर्ड तपासलं. कारण त्यामुळे किती लोकांना या संसर्गाचा धोका असू शकतो याचा अंदाज लावता येणार होता. त्यानंतर आम्हाला संसर्ग होणाऱ्यांची संख्या किती मोठी आहे याची कल्पना आली आणि भीलवाडा आता हॉटस्पॉट बनले होते', असं डाबी यांनी सांगितलं. रुग्णांच्या संख्येबाबतचा अंदाज आणि त्याच्या पुढच्या धोक्याची कल्पना येताच जिल्हा प्रशासनाने तात्काळ जिल्हा बंद करण्याचा निर्णय घेतला आणि भीलवाडा सील करण्यात आलं. देशात 25 मार्चपासून लॉकाडऊन सुरू झालं पण त्याआधीच भीलवाडा बंद करण्यात आला होता. भीलवाडा बंद कऱण्याच्या निर्णयाबद्दल सांगताना टीना डाबी म्हणाल्या की, 'मला आठवंत 20 मार्च ही तारीख होती. आम्ही शहर बंद केलं होतं. लोकांना टेन्शन घेऊ नका असं सांगितलं तसंच त्यांना घरात परतण्यास सांगितलं. सर्व दुकानं बंद कऱण्यात आली. ते एक मोठ आव्हान होतं आणि त्यांनी याआधी कधीच असं पाहिलं नसल्यानं समजावणं कठीण होतं. हे करायला आम्ही एक दिवस किंबहूना त्यापेक्षा जास्त वेळ घेतला. पण हा निर्णय आमच्या पथ्यावर पडला. आम्ही फारच आक्रमक आणि कठोरपणे हा निर्णय घेतला आणि आम्हाला पूर्ण बंद करायचं आहे यावर ठाम होतो.' हे वाचा : दिलासादायक: सांगलीत 22 जण कोरोनामुक्त, कोरोनाबाधितांचा आकडा आला 4 वर सगळं बंद केल्यानंत जिल्हा प्रशासनाने रुग्णांकडे मोर्चा वळवला. सर्व संशयितांचे स्क्रीनिंग केलं. यात शहरात राहणाऱ्या सर्वांचा समावेश होता. 'काही ठिकाणी स्क्रिनिंगसाठी कठोर भूमिका वेगवेगळ्या टप्प्यात घ्यावी लागली. पहिल्यांदा मेडिकल स्टाफ आणि त्यांच्या कुटुंबिय आणि संपर्कात आलेले आणि त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्यांची कुटुंबे अशा क्रमानं संपूर्ण शहराचं स्क्रीनिंग करण्यात आलं',अशी माहिती टीना डाबी यांनी दिली. पाहा : PHOTOS : कोरोनाबद्दल अफवा नाही तर जनजागृती करणारी व्यंगचित्र पसरवा प्रशासनाकडून लोकांना सोशल डिस्टन्सिंगबाबत सातत्यानंस सांगण्यात आलं आणि त्यांची अंमलबजावणीही करण्यात आली. समाजांमधील नेत्यांना खेड्यांमध्ये यासाठी कोरोना फायटर्स म्हणून नेमण्यात आलं. टीना डाबी यांनी सांगितलं की, जिल्हाधिकारी राजेंद्र भट यांच्या मते हे सगळं निर्दयीपणे राबवल्यामुळं होऊ शकलं. आक्रमकपणे स्क्रिनिंग, टेस्टिंग आणि लॉकडाऊनचा निर्णय म्हणजेच भीलवाडा पॅटर्न. मला विश्वास आहे इतर जिल्ह्यांमध्ये जिथं कोरोनाची लागण आहे तिथंही हा पॅटर्न लागू होईल. हे वाचा : भारतात इटलीसारखाच पसरत आहे कोरोना, तरीही देशासाठी आहे दिलासादायक बाब संपादन - सुरज यादव
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या