Home /News /maharashtra /

दिलासादायक: सांगलीत 22 जण कोरोनामुक्त, कोरोनाबाधितांचा आकडा आला 4 वर

दिलासादायक: सांगलीत 22 जण कोरोनामुक्त, कोरोनाबाधितांचा आकडा आला 4 वर

मेडिकल प्रक्रियेदरम्यान आरोग्य कर्माचाऱ्यांचा रुग्णांशी सर्वाधिक संपर्क येतो. त्यामुळे इतर कोणत्याही मास्कपेक्षा हे मास्क अधिक उपयुक्त ठरतात.

मेडिकल प्रक्रियेदरम्यान आरोग्य कर्माचाऱ्यांचा रुग्णांशी सर्वाधिक संपर्क येतो. त्यामुळे इतर कोणत्याही मास्कपेक्षा हे मास्क अधिक उपयुक्त ठरतात.

कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून सांगलीचा उल्लेख केला जात होता. मात्र, आता सांगलीची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरु आहे.

सांगली, 9 एप्रिल: राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असताना सांगलीतून दिलासादायक वृत्त आहे. इस्लामपुरचे आणखी 12 कोरोनाबाधित रुग्ण हे पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यामुळे 26 पैकी आता 22 जण कोरोनामुक्त झाले आहेत. परिणामी सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा कमी होऊन 4 वर आला आहे. त्यामुळे सांगलीकरांसह प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे. सांगलीची वाटचाल आता कोरोनामुक्तीकडे.. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमधील कोरोनाबाधितांचा आकडा 26 पोहोचला होता. त्यामुळे कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून सांगलीचा उल्लेख केला जात होता. मात्र, आता सांगलीची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरु आहे. गुरुवारी 16 कोरोनाबाधित रुग्णांची दुसरी चाचणी घेण्यात आली होती. रात्री उशिरा त्यापैकी 12 रुग्णांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले आहेत.आता केवळ चार कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यांच्यावर मिरज येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रुग्णांमध्ये एका दोन वर्षांच्या चिमुरड्याचा समावेश आहे. हेही वाचा..PHOTOS : कोरोनाबद्दल अफवा नाही तर जनजागृती करणारी व्यंगचित्र पसरवा चार दिवसांपूर्वीच कोरोनामुक्त झाल्याने चार जणांना डिस्चार्ज देऊन इन्स्टिट्यूट क्वारंटाईनमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यामुळे 22 रुग्णांची संख्या मिरजेतील रुग्णालयात होती. त्यानंतर 6 जणांचे दोन्ही टेस्ट निगेटिव्ह आली तर बुधवारी आणखी 6 जणांचे अहवाल हे निगेटिव्ह आले. त्यामुळे सांगलीचा कोरोना बाधितांचा आकडा 10 ने कमी होऊन 16 वर पोहोचला होता. गुरुवारी 16 पैकी 12 जणांचे दोन्ही टेस्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे इस्लामपुरचा कोरोनाचा 26 त्यांनतर 22, मग 16 वर असणारा आकडा आता केवळ 4 वर आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली आहे. हेही वाचा..धक्कादायक: राज्यात एका तासाला एक कोरोनाबाधिताचा मृत्यू, रुग्ण संख्याही वाढली दरम्यान, सौदी अरेबियातून 13 मार्च रोजी भारतात दाखल झालेल्या चौघा मनेर कुटुंबियांना पहिल्यांदा कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर 14 मार्च रोजी इस्लामपूर या गावी आल्यानंतर त्यांच्या संपर्कात येऊन त्यांच्यासह 26 जणांना कोरोची लागण झाली होती. त्यामुळे संपूर्ण जिल्हा आणि राज्य हादरून गेलं होतं. मात्र आता हे सर्वजण हळूहळू कोरोना मुक्त होऊ लागल्याने सांगलीकर जनता आणि प्रशासनाला मोठा दिलासा मिळला आहे. संपादन- संदीप पारोळेकर
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या