Home /News /national /

निजामुद्दीनच्या परिषदेत होते 1830 लोक, महाराष्ट्रासह 19 राज्यांत पसरला कोरोना; पाहा संपूर्ण लिस्ट

निजामुद्दीनच्या परिषदेत होते 1830 लोक, महाराष्ट्रासह 19 राज्यांत पसरला कोरोना; पाहा संपूर्ण लिस्ट

निजामुद्दीन येथील तब्लिगी जमात परिषदेत देशातील विविध राज्यांमधूनच नव्हे तर परदेशातूनही लोकं हजर होते.

    नवी दिल्ली, 30 मार्च : देशभरात सध्या दिल्लीच्या निजामुद्दीन येथील तब्लिगी जमात परिषदेमुळे भीतीचे वातावरण आहे. 13 ते 15 मार्च दरम्यान फक्त देशातील विविध राज्यांमधूनच नव्हे तर परदेशातूनही लोकं हजर होते. भारत आणि परदेशातील लोकांसह एकूण 1830 लोक या परिषदेसाठी उपस्थित होते. 15 मार्चनंतर तब्बल 1400 लोकं दिल्लीमध्ये होते. आतापर्यंत 300 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या परिषदेतून बाहेर पडलेल्या 6 जणांचा तेलंगणात तर कर्नाटक, जम्मु काश्मीर आणि मुंबईत प्रत्येकी एक अशा 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिल्ली रुग्णालायत असणाऱ्या 35 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. एकीकडे या परिषदेमुळे देशभरात कोरोना पसरत असताना दुसरीकडे, अंदमानमधील 10 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या 10 पैकी 9 लोकं तब्लिगी जमात परिषदेत सहभागी झाले होते. या परिषदेत सामिल झालेले 1830 लोकं राज्याच्या विविध भागातून आले होते. देशातील विविध राज्यातून आलेल्या लोकांची संख्या अंदमान- 21 आसाम - 216 बिहार - 86 हरियाणा- 22 हिमाचल- 15 हैदराबाद- 55 कर्नाटक- 45 केरळ- 15 महाराष्ट्र- 109 मेघालय- 5 मध्य प्रदेश- 107 ओडिशा- 15 पंजाब- 9 राजस्थान- 19 रांची- 46 तमिळनाडु- 501 उत्तराखंड- 34 उत्तर प्रदेश- 156 पश्चिम बंगाल- 73 विदेशातून आलेले लोकं इंडोनेशिया- 72 थायलॅंड- 71 श्रीलंका- 34 म्यानमार- 33 कीर्गिस्तान- 28 मलेशिया- 20 नेपाळ- 19 बांगलादेश- 19 फिजी- 4 इंग्लंड- 3 कुवेत- 2 फ्रान्स- 1 सिंगापुर- 1 अल्जेरिया- 1 जिबूती- 1 अफगाणिस्तान- 1 वाचा-दिल्लीतील एका चुकीमुळे देशभरात खळबळ, मुंबईपासून-अंदमानपर्यंत पसरला कोरोना मुंबईत एकाचा मृत्यू कोविड-19 मुळे 22 मार्च रोजी फिलिपीनोच्या 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. हा मृत व्यक्ती दिल्लीच्या निजामुद्दीनमधील तब्लिगी जमात परिषदेत सहभागी झाला होता अशी माहिती समोर आली आहे. 10 जणांच्या टोळीसोबत हा व्यक्ती तिथे गेला होता. यातील आणखी 2 जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा गट नवी मुंबईतील एका मशिदीत थांबला होता. या मशिदीतील मौलानांना कोरोनाची लागण झाली. त्यांचा मुलगा, नातू आणि घरी काम करणाऱ्या महिलेलासुद्धा कोरोनाची लागण झाली. या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलं आहे. वाचा-कोरोनाचा उद्रेक! निजामुद्दीनमध्ये एकाच ठिकाणी 200-300 लोकं कोरोना संशयित, 6 जणांचा मृत्यू उत्तर प्रदेश राज्याच्या सीमा सील या परिषदेसाठी उत्तर प्रदेशातील 157 लोक सामिल झाल्याची माहिती आहे. ही सर्व लोकं दिल्लीत असून तेथील रुग्णालयात त्यांना अलग ठेवण्यात आले आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे. उत्तर प्रदेश राज्याची संपूर्ण सीमा सील केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही राज्यातील जनतेने जिथे आहेत तिथेच राहिले पाहिजे असे म्हटले आहे. या क्षणी कोणालाही सीमा ओलांडण्याची परवानगी दिली जाणार नाही. लखनऊ, गाझियाबाद, मेरठ, सहारनपूर, मुजफ्फरनगर, शामली, हापूर, बिजनौर, बागपत, वाराणसी, भदोही, मथुरा, आग्रा, सीतापूर, बाराबंकी, प्रयागराज, बहराईच, गोंडा आणि बलरामपूर येथील लोक जमातमध्ये दाखल झाल्याची माहिती मिळाली. वाचा-'10 सेकंद श्वास रोखलात तर तुम्हाला कोरोना नाही', व्हायरसच्या सेल्फ टेस्टबाबत Fact Check वाहनांसाठी मागवला होता कर्फ्यू पास तब्लिगी जमात परिषदेचे वकील फुजाईल अय्युबी यांनी, परिषदेदरम्यान कर्फ्यू पाससाठी पत्र लिहिले गेले होते. 17 वाहनांसाठी पासची मागणी केली गेली, जेणेकरून दूर राहणाऱ्या लोकांना त्यांच्या घरी पाठवता येईल, असे सांगितले. 22 मार्च रोजी सार्वजनिक कर्फ्यू आणि नंतर लॉकडाऊनमुळे लोकांना घरी पाठवणे कठीण झाले होते. त्यामुळं या संपूर्ण प्रकरणाने दिल्ली पोलीस आणि प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. परिषेदेच्या वतीने जारी करण्यात आलेल्या निवेदनात, 24 मार्चपासून आम्ही सतत पोलिस आणि प्रशासनाच्या संपर्कात होते, असे सांगण्यात आले आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या