Home /News /national /

कोरोनाचा उद्रेक! निजामुद्दीनमध्ये एकाच ठिकाणी 200-300 लोकं कोरोना संशयित, 6 जणांचा मृत्यू

कोरोनाचा उद्रेक! निजामुद्दीनमध्ये एकाच ठिकाणी 200-300 लोकं कोरोना संशयित, 6 जणांचा मृत्यू

13 ते 15 मार्च दरम्यान दिल्लीच्या निजामुद्दीनमधील तबलीघी मारकझला तब्बल 1500 लोकांनी भेट दिली होती. यातील 24 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

    नवी दिल्ली, 31 मार्च : कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता, देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. मात्र अजूनही लोकं याकडे गांभिर्याने पाहत नसल्याचे दिसत आहे. यातच देशभरातून तब्बल 1500 लोकांनी 13 ते 15 मार्च दरम्यान दिल्लीच्या निजामुद्दीनमधील तब्लिगी मारकझला भेट दिली. दरम्यान, येथे जमलेल्या बर्‍याच जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. येथे जमलेल्यांपैकी आतापर्यंत 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर, 200हून अधिक लोकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तब्लिगी मरकझ येथे उत्तर प्रदेशातील तब्बल 157 लोकं सामिल झाली होती. यानंतर उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने सर्व जिल्ह्यांमधील माहिती मागणारे एक पत्र जारी केले आहे. दिल्ली सरकारच्या वतीने मौलाना यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, मृत्यू झालेल्यांपैकी सहा जण तेलंगणातील आहेत. दिल्ली पोलिसांच्या वतीने या संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहेत. 200 लोकांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर तब्बल 2000 लोकांना होम क्वारंटाईन केले आहे. तर, 400 घरांना विलगीकरण करण्यात आले आहे. याआधी अंदमानवरून तब्बल 9 धर्मोपदेशकांनाही तबलीघी मारकझला भेट दिली होती. यातील एकाचा श्रीनगरमध्ये कोरोनामुळे मृत्यूही झाला होता. मात्र आता तब्बल 15 दिवसांनी संशयित रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यानंतर प्रशासनाने याकडे लक्ष दिले आहे. वाचा-देशात दुसऱ्यांदा लागला महाराष्ट्रातील 'या' शहरात 'जनता कर्फ्यू' आतापर्यंत दिल्लीत निजामुद्दीन येथे जमलेल्यांपैकी 24 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर अद्याप बऱ्याच लोकांची चाचणी करणे बाकी आहे. याशिवाय 228 संशयित रुग्णांनाही दिल्लीतील दोन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचा अहवाल येणे बाकी आहे. अशा प्रकारे एकूण 252 लोकांना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी, आयोजकांनी अत्यंत गंभीर गुन्हा केला आहे. मी उपराज्यपालांना पत्र लिहून त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे आणि त्यांची सुटका होऊ नये, अशी विनंती केली आहे. तसेच, जवाहरलाल नेहरू स्टेडियमला आयसोलेशन केंद्र बनविण्यास केंद्र सरकारने मान्यता दिलेली नाही, अशी माहिती दिली. वाचा-धक्कादायक! 24 तासात 61 हजार लोकांना झाला कोरोना तर 3719 जणांचा मृत्यू उत्तर प्रदेशातील 18 शहरांमधील लोकं सामिल उत्तर प्रदेशमधील सर्व लोक दिल्लीत असून तेथील रुग्णालयात त्यांना अलग ठेवण्यात आले आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे. उत्तर प्रदेश राज्याची संपूर्ण सीमा सील केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही राज्यातील जनतेने जिथे आहेत तिथेच राहिले पाहिजे असे म्हटले आहे. या क्षणी कोणालाही सीमा ओलांडण्याची परवानगी दिली जाणार नाही. लखनऊ, गाझियाबाद, मेरठ, सहारनपूर, मुजफ्फरनगर, शामली, हापूर, बिजनौर, बागपत, वाराणसी, भदोही, मथुरा, आग्रा, सीतापूर, बाराबंकी, प्रयागराज, बहराईच, गोंडा आणि बलरामपूर येथील लोक जमातमध्ये दाखल झाल्याची माहिती मिळाली. वाचा-चिंताजनक, 14 नाही तर तब्बल 20 दिवसांनी दिसली कोरोनाची लक्षणं तब्लिगी म्हणजे काय तबलीघीचा अर्थ शिक्षणाचे आणि मुख्य कार्यालयाचे रूपांतर धर्माचा विस्तार करणे. निजामुद्दीनमध्ये असलेले हे केंद्र मुस्लिमांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. 13 ते 15 मार्च दरम्यान येथे मोठ्या संख्येने लोकं उपस्थित होती. यात काही परदेशी नागरिकांचाही समावेश असण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनच्या वेळी येथे 1500 लोक उपस्थित होते.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या