दिल्लीतील एका चुकीमुळे देशभरात खळबळ, मुंबईपासून-अंदमानपर्यंत पसरला कोरोना

दिल्लीतील एका चुकीमुळे देशभरात खळबळ, मुंबईपासून-अंदमानपर्यंत पसरला कोरोना

देशात सध्या दिल्लीच्या निजामुद्दीनमधील तब्लिगी जमात परिषदेने खळबळ माजली आहे. या परिषदेतून बाहेर पडलेल्या 6 जणांचा तेलंगणात तर एकाचा मुंबईत मृत्यू झाला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 31 मार्च : देशात सध्या दिल्लीच्या निजामुद्दीनमधील तब्लिगी जमात परिषदेने खळबळ माजली आहे. 13 ते 15 मार्च दरम्यान निजामुद्दीन येथे 1500 ते 2000 लोकं येथे जमले होते. या परिषदेतून बाहेर पडलेल्या 6 जणांचा तेलंगणात तर कर्नाटक, तामिळनाडू, जम्मु काश्मीर आणि मुंबईतील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. तर, 24 लोकांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

सध्या, दिल्ली सरकारच्या वतीने मौलाना यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहेत. आतापर्यंत 200हून अधिक लोकांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तब्बल 2 हजार लोकांना होम क्वारंटाईन आणि 400 घरांवर पहारे ठेवण्यात येत आहेत. या एका परिषदेमुळे देशभरात कोरोना पसरण्याची शक्यता आहे. कारण या परिषदेसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लोकं सामिल झाली होती.

वाचा-निजामुद्दीनमुळे नवी मुंबईतही धोका, एकाच्या मृत्यूनंतर सरकारने सुरू केली चौकशी

मुंबईत एकाचा मृत्यू

कोविड-19 मुळे 22 मार्च रोजी फिलिपीनोच्या 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. हा मृत व्यक्ती दिल्लीच्या निजामुद्दीनमधील तब्लिगी जमात परिषदेत सहभागी झाला होता अशी माहिती समोर आली आहे. 10 जणांच्या टोळीसोबत हा व्यक्ती तिथे गेला होता. यातील आणखी 2 जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा गट नवी मुंबईतील एका मशिदीत थांबला होता. या मशिदीतील मौलानांना कोरोनाची लागण झाली. त्यांचा मुलगा, नातू आणि घरी काम करणाऱ्या महिलेलासुद्धा कोरोनाची लागण झाली. या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलं आहे.

तेलंगणामध्ये 6 लोकांचा मृत्यू

या परिषदेत तेलंगणामधील मुस्लिम मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र परिषदेनंतर यातील बहुसंख्य लोक परदेशात गेले. त्यानंतर पुन्हा मायदेशी परतल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामुळं आतापर्यंत तेलंगणातील 6 लोकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण देशात खळबळ माजली आहे.

वाचा-निजामुद्दीनमध्ये एकाच ठिकाणी 200-300 लोकं कोरोना संशयित, 6 जणांचा मृत्यू

अंदमानवरून आलेल्या 9 धर्मोपदेशकांनाही कोरोनाही लागण

दिल्लीच्या निजामुद्दीनमधील तब्लिगी जमात परिषदेसाठी अंदमान-निकोबार बेटावरून तब्बल 9 धर्मोपदेशक आले होते. काही दिवसांपूर्वी यातील एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. असे सांगितले जात आहे की या परिषदेत सामिल झालेल्या काहींनी इंडोनेशिया, मलेशिया आणि जपानला देखील भेट दिली. तेथून परत आल्यानंतर त्यापैकी बरेच जण तेलंगणा, तामिळनाडू आणि अंदमान येथे गेले.

उत्तर प्रदेश राज्याच्या सीमा सील

या परिषदेसाठी उत्तर प्रदेशातील 157 लोक सामिल झाल्याची माहिती आहे. ही सर्व लोकं दिल्लीत असून तेथील रुग्णालयात त्यांना अलग ठेवण्यात आले आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे. उत्तर प्रदेश राज्याची संपूर्ण सीमा सील केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही राज्यातील जनतेने जिथे आहेत तिथेच राहिले पाहिजे असे म्हटले आहे. या क्षणी कोणालाही सीमा ओलांडण्याची परवानगी दिली जाणार नाही. लखनऊ, गाझियाबाद, मेरठ, सहारनपूर, मुजफ्फरनगर, शामली, हापूर, बिजनौर, बागपत, वाराणसी, भदोही, मथुरा, आग्रा, सीतापूर, बाराबंकी, प्रयागराज, बहराईच, गोंडा आणि बलरामपूर येथील लोक जमातमध्ये दाखल झाल्याची माहिती मिळाली.

वाचा-खळबळजनक! परदेशातील 10 जणांना मशिदीत ठेवलं लपून, पोलिसांनी घेतलं ताब्यात

वाहनांसाठी मागवला होता कर्फ्यू पास

तब्लिगी जमात परिषदेचे वकील फुजाईल अय्युबी यांनी, परिषदेदरम्यान कर्फ्यू पाससाठी पत्र लिहिले गेले होते. 17 वाहनांसाठी पासची मागणी केली गेली, जेणेकरून दूर राहणाऱ्या लोकांना त्यांच्या घरी पाठवता येईल, असे सांगितले. 22 मार्च रोजी सार्वजनिक कर्फ्यू आणि नंतर लॉकडाऊनमुळे लोकांना घरी पाठवणे कठीण झाले होते. त्यामुळं या संपूर्ण प्रकरणाने दिल्ली पोलीस आणि प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. परिषेदेच्या वतीने जारी करण्यात आलेल्या निवेदनात, 24 मार्चपासून आम्ही सतत पोलिस आणि प्रशासनाच्या संपर्कात होते, असे सांगण्यात आले आहे.

First published: March 31, 2020, 11:45 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading