जाहिरात
मराठी बातम्या / देश / भारतात कोरोनावर उपचारासाठी आणखी एका औषधाला मंजुरी; गेमचेंजर ठरणार असल्याचा दावा

भारतात कोरोनावर उपचारासाठी आणखी एका औषधाला मंजुरी; गेमचेंजर ठरणार असल्याचा दावा

मात्र आता रशियात सर्व सामान्यांसाठी ही लस उपलब्ध होणार असल्याने त्याच्या प्रयोग आणि निष्कर्षांकडे सर्व जगाचं लक्ष लागलं आहे.

मात्र आता रशियात सर्व सामान्यांसाठी ही लस उपलब्ध होणार असल्याने त्याच्या प्रयोग आणि निष्कर्षांकडे सर्व जगाचं लक्ष लागलं आहे.

कोरोनावर उपचारांसाठी टॅबलेटनंतर आता इंजेक्शनच्या स्वरूपातही भारतात औषध उत्पादित केलं जाणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 21 जून :  भारतात कोरोना रुग्णांवर उपचारासाठी आता फॅबिफ्लूनंतर कोविफॉर औषधाला परवानगी देण्यात आली आहे. कोविफॉर म्हणजे रेमेडेसिवीर (Remdesivir) औषध. जे अमेरिकेतील फार्मा कंपनी गिलीड सायन्सेज औषध आहे. भारतात हेटरो कंपनीमार्फत हे औषध उत्पादित केलं जाणार आहे, जे कोविफॉर (covifor) नावानं विकलं जाईल. या दोन्ही कंपन्यांमध्ये करार झाला आहे. ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडियाने (DCGI) हेटरो कंपनीला कॉविफॉर औषधाचं उत्पादन आणि मार्केटिंग करण्यास परवानगी दिली आहे. हेटरो कंपनीने (hetero) याबाबत परिपत्रक जारी केलं आहे. हेटरो ग्रुप ऑफ कंपनीचे चेअरमॅन डॉ. बी पार्था सराधी रेड्डी यांनी सांगितलं, “भारतातील कोरोनाव्हायरसची वाढती प्रकरणं पाहता कोविफॉर हे औषध गेम चेंजर ठरू शकतं. कारण याचे क्लिनिक परिणाम सकारात्मक आहेत. देशभरातील रुग्णांपर्यंत हे औषध पोहोचवण्यासाठी आम्ही तयार आहोत” हे वाचा -  कोरोना हॉटस्पॉट ते मॉडेल; धारावी कसा सोडवतेय कोरोनाचा विळखा? रुग्णालयात दाखल असलेल्या आणि गंभीर लक्षणं असलेल्या रुग्णांना हे औषध दिलं जाईल. यामध्ये वयस्कर व्यक्ती आणि लहान मुलांचाही समावेश आहे. 100 मिली ग्राम इंजेक्शनच्या रूपात हे औषध असेल. रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीतच हे औषध दिलं जाईल. या आधी फॅबिफ्लूला मंजुरी ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स या मुंबईतल्या औषध निर्मात्या कंपनीला कोरोनावर उपचारासाठी गोळी तयार करण्याची परवानगी मिळाली आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने ही परवानगी दिली आहे. अँटीव्हायरल औषध असलेल्या फेव्हिपिरावीर (Favipiravir) ला फॅबिफ्लू (FabiFlu) या नावाने कंपनी बाजारात आणणार आहे. हे वाचा -  आता MASK च करणार कोरोनाव्हायरसचा नाश; एकच मास्क पुन्हा पुन्हा वापरताही येणार कोरोनाची प्राथमिक लक्षणे असलेल्या रुग्णांना हे औषध दिलं जाणार आहे. या औषधाचं उत्पादन आणि मार्केटींगसाठी कंपनीला परवानगी मिळाल्याचा दावा कंपनीने केला आहे. ग्लेनमार्क ही 200 Mgची गोळी तयार करणार आहे. सध्या औषधाचे प्रयोग सुरू आहेत. आणीबाणीच्या परिस्थितीत असे प्रयोग करायला परवानगी दिली जात आहे. सुरुवातीला 1 हजार रुग्णांना ही गोळी देऊन त्याचा अभ्यास केला जाणार आहे. संकलन, संपादन - प्रिया लाड

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात