81 देशांमध्ये कोरोनाव्हायरसची दुसरी लहर; WHO ने व्यक्त केली चिंता

81 देशांमध्ये कोरोनाव्हायरसची दुसरी लहर; WHO ने व्यक्त केली चिंता

  • Share this:

जिनिव्हा, 21 जून : जगभरात कोरोनाव्हायरस रुग्णांची आकडेवारी झपाट्याने वाढते आहे. आता 81 देशांमध्ये कोरोनाव्हायरसची दुसरी लहर सुरू (second wave of coronavirus) होत आहे. अनलॉकमुळे कोरोनाची प्रकरणं झपाट्याने वाढू लागल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) म्हटलं आहे.

चीनमध्ये कोरोनाव्हायरसने पुन्हा डोकं वर काढलं. गेल्या काही दिवसांपासून राजधानी बीजिंगमध्ये नवीन प्रकरणं येऊ लागलीत. अमेरिका,पाकिस्तान, बांग्लादेश, इज्राइल, स्वीडन, दक्षिण आफ्रिका, ब्राजील इत्यादी देशांमध्ये कोरोना थैमान घालत आहे. फक्त 36 देशांमध्ये कोरोनाव्हायरसची प्रकरणं कमी झालीत.

हिंदी न्यूज 18 च्या वृत्तानुसार आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रोस गेब्रेयसेस यांनी सांगितलं, "बहुतेक देशांमध्ये अनलॉकमुळे कोरोनाचा धोका वाढला आहे. लोकं कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी असलेल्या नियमांचं उल्लंघन करत आहेत. मास्कही नीट लावत नाही. त्यामुळे या देशांमध्ये गेल्या काही आठवड्यात संक्रमण झपाट्याने वाढलं आहे"

"दक्षिण एशिया, मध्य पूर्व और आफ्रिकी देशांची परिस्थिती आणखीनच खराब होईल", असंही त्यांनी सांगितलं.

हे वाचा - कोरोना ही शेवटची महासाथ नाही, पुढील आव्हानांसाठी तयार राहा; WHO ने केलं सावध

जगभरात कोरोनाव्हायरसची 8,950,489 प्रकरणं आहेत. 467,354 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक प्रकरणं अमेरिकेत आहेत. तर सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत भारत चौथ्या स्थानी आहे.

भारतातील आजच्या आकडेवारीनुसार, देशात  गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 15413 रुग्ण आढळून आली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 4,10,461 वर पोहोचली आहे. तर  अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 1,69,451 इतकी आहे.  गेल्या 24 तासामध्ये 15,413 रुग्णांची वाढ झाली आहे. आतापर्यंतही ही सर्वाधिक रुग्णांची संख्या असल्याचं समोर आले आहे. तर देशभरात 306 लोकांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी गेल्या 24 तासातील असून चिंताजनक आहे. तर देशभरात आतापर्यंत  एकूण 13254 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

हे वाचा - चिंताजनक बातमी, देशातली आतापर्यंतची कोरोनाची धक्कादायक आकडेवारी समोर

आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जगतेला संबोधित केलं आहे. यावेळी त्यांनी कोरोनाला हरवण्यासाठी योग आणि प्राणायाम कसा महत्त्वाचा आहे हे सांगितलं. योग केवळ शारीरिकच नाही तर मानसिक स्वास्थही चांगलं ठेवण्यासाठी मदत करतो. त्यामुळे प्रत्येकानं दिवसातला काही वेळ योग आणि प्राणायाम करायला हवा. योग आणि प्राणायाम करून आपण कोरोनाविरुद्ध लढा देऊ शकतो,  असंही मोदी म्हणाले.

संकलन, संपादन - प्रिया लाड

First published: June 21, 2020, 6:45 PM IST

ताज्या बातम्या