नवी दिल्ली 26 एप्रिल: कोरोनाविरुद्धच्या लढाईत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कायम देशवासीयांशी संवाद साधत आहेत. लोकांशी थेट संवाद साधण्यात ते कायम अग्रेसर असतात. आपल्या पहिल्या भाषणापासून ते लोकांना मास्क वापरा, सोशल डिस्टन्ससिंगचं पालन करा, हात वारंवार धुवा असं आवाहन करत आहेत. त्यानंतरच्या मुख्यमंत्र्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्स परिषदेत त्यांना पहिल्यांदा मास्क घातलेलं सगळ्यांनी पाहिलं. त्यानंतर त्यांच्या मास्कची चर्चा सगळीकडे सुरू झाली. त्यानंतर अनेकदा ते मास्क घालून दिसले. त्यावेळी त्यांनी जे मास्क वापरले त्याची आता चर्चा सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या लॉकडाऊनच्या पहिल्या भाषणात तुम्ही घरीच मास्क तयार करू शकता हा सल्ला दिला होता. उगाच मास्कसाठी दुकानावर गर्दी करू नका. घरीच साध्या स्वच्छ कपड्यांपासून मास्क तयार करा किंवा स्वच्छ रुमाल वापरा असं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर त्यांनी देशातल्या सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली त्यावेळी त्यांनी घरीच बनवलेला पांढऱ्या रुमालाचा मास्क वापरला होता. नंतर दोन वेळा ते मास्क घालून दिसले होते. मात्र ते मास्क म्हणजे त्यांच गळ्याभोवती वापरतात ते उपरणं होतं. त्याचाच वापर त्यांनी मास्क म्हणून केला होता. कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर सगळ्यांनी मेडिकल दुकानांमध्ये मास्क घेण्यासाठी गर्दी केली होती. त्यामुळे मास्कचा तुटवडा निर्माण झाला होता. त्याचा काळाबाजारही होत होता.
मात्र मास्क हा विकत घेण्याचीच गरज नाही घरीही अगदी पैसे न खर्च करताही मास्क तयार करता येतो हेच पंतप्रधान मोदींनी आपल्या कृतीतून दाखवून दिल्याची मतही व्यक्त केलं जात आहे. त्याचबरोबर ते दिसायलाही चांगले दिसतात. त्यामुळे आता देशातही मोदी मास्क म्हणून अशा उपरण्यांचा वापर करण्याची पद्धत सुरू झाली आहे.