ठाणे, 22 फेब्रुवारी : “माझ्या मुलीचा जीव धोक्यात आहे, तिला वाचवा, त्या जहाजातून बाहेर काढा”, अशी आर्त हाक घातली आहे ती महाराष्ट्रातल्या (Maharashtra) लेकीच्या बाबानं. ठाण्यात राहणारे दिनेश ठक्कर (Dinesh thakkar) यांची मुलगी सोनाली ठक्कर (Sonali thakkar) जपानच्या (Japan) त्या जहाजावर अडकली आहे, जे जहाज कोरोनाव्हायरसचे (Coronavirus) रुग्ण आढळून आल्याने कित्येक दिवसांपासून अडवून ठेवण्यात आलं आहे. या जहाजात महाराष्ट्राची लेक अडकली आहे आणि तिला वाचवण्यासाठी तिच्या बाबांनी पंतप्रधान मोदींना (PM Narendra modi) पत्र लिहिलं आहे.
जपानच्या सागरीकिनाऱ्यावर असलेल्या डायमंड प्रिन्सेस क्रुझवर (Dimond preincess cruise) कित्येक भारतीय अडकले. यामध्ये महाराष्ट्राच्या ठाण्यातील सोनाली ठक्करचाही समावेश आहे. आपल्याला इथून बाहेर काढावं, अशी मदत सोनालीने भारत सरकारकडे मागितली. ट्विटरवर तिने आपला व्हिडिओ शेअर केला. त्यानंतर तिच्या बाबांनी आपल्या लेकीला वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे.
@narendramodi @rashtrapatibhvn @BSKoshyari @MEAIndia @uddhavthackeray @PratapSarnaik @rajanvichare pic.twitter.com/jPIW76U6pG
— Dinesh Thakkar (@Dineshjthakkar) February 21, 2020
हेदेखील वाचा - कोरोनाग्रस्तांसाठी झटणाऱ्या डॉक्टरांनाच कोरोना; रुग्णावर उपचाराकरीता आपलं लग्न पुढे ढकलणाऱ्या डॉक्टरचा मृत्यू
दिनेश ठक्कर यांनी पत्रात म्हटलं आहे की, “माझी मुलगी सोनाली ठक्कर डिसेंबर 2019 पासून डायमंड प्रिन्सेस क्रुझवर काम करते आहे. या जहाजावरील काही प्रवाशांना कोरोनाव्हायर झाला आहे, त्यामुळे योकोहामामध्ये हे जहाज अडवून ठेवण्यात आलं आहे. माझी मुलगी या जहाजावर एका छोट्याशा खोलीत राहते आहे आणि तिला कोरोनाव्हायरसची लागण झाली नाही, हे स्पष्ट झालं आहे. तरीही माझ्या मुलीचा जीव धोक्यात आहे. तिला इतरांपासून कोरोनाव्हायरसची लागण होऊ नये, यासाठी तिला तिथून लवकरात लवकर बाहेर काढा”
Government se koi support mil sakta he? @narendramodi @MEAIndia @DrSJaishankar @AmitShah @PTI_News @abpmajhatv @IndianExpress @CNNnews18 @the_hindu @News18lokmat @uddhavthackeray @BBCHindi @aajtak @ndtvindia pic.twitter.com/B36zNvoV30
— Dinesh Thakkar (@Dineshjthakkar) February 18, 2020
हेदेखील वाचा - बापरे! जेलमध्ये घुसला कोरोनाव्हायरस आणि अधिकाऱ्यांची गेली नोकरी
या जहाजामधून गेल्या महिन्यात हाँगकाँगमध्ये उतरलेल्या एका प्रवाशाला कोरोनाव्हायरसचं निदान झालं. त्यानंतर योकाहामा बंदरावर 3 फेब्रुवारीपासून हे जहाज अडवून ठेवण्यात आलं आहे, इतर जहाजांपासून वेगळं ठेवण्यात आलं आहे. या जहाजावरील एकूण 3,711 जणांमध्ये 132 क्रू आणि 6 प्रवासी असे एकूण 138 भारतीय आहेत.
जहाजावरील तब्बल 634 जणांना कोरोनाव्हायरची लागण झाली आहे, त्यात 8 भारतीयांचा समावेश आहे. त्यांच्यावर जपानच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होते आहे, अशी माहिती भारतीय दूतावासाने दिली आहे. दरम्यान जहाजावर कोरोनाव्हायरसची लागण झालेल्या दोघांचा मृत्यू झाला आहे.
जिथून या व्हायरसचा उद्रेक झाला त्या चीनमध्ये कोरोनाव्हायरसच्या मृतांची संख्या 2,345 झाली आहे तर 76,288 जणांना याची लागण झाली आहे, अशी माहिती चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली.
हेदेखील वाचा - अवघ्या 7 महिन्यांच्या जीवाची 'कोरोना'शी टक्कर, दहशतीत ठेवणाऱ्या व्हायरसला हरवलं
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Japan, Maharashtra, Narendra modi, Pm modi