मराठी बातम्या /बातम्या /विदेश /बापरे! जेलमध्ये घुसला कोरोनाव्हायरस आणि अधिकाऱ्यांची गेली नोकरी

बापरे! जेलमध्ये घुसला कोरोनाव्हायरस आणि अधिकाऱ्यांची गेली नोकरी

दिल्लीमध्ये कोरोना बाधित रुग्णाची केस पहिल्यांदा 2 मार्चला समोर आली होती. कोरोना बाधित रुग्ण हा इटलीतून आला होता.

दिल्लीमध्ये कोरोना बाधित रुग्णाची केस पहिल्यांदा 2 मार्चला समोर आली होती. कोरोना बाधित रुग्ण हा इटलीतून आला होता.

शानडोंग (Shandong), झेजियांग (Zhejiang), हुबेई (Hubei) प्रांतातील जेलमधील (Jail) कैद्यांना कोरोनाव्हायरसची (Coronavirus) लागण झाली आहे.

बीजिंग, 21 फेब्रुवारी : चीनसह (China) संपूर्ण जगभरात हाहाःकार माजवणारा कोरोनाव्हायरस (Coronavirus) आता जेलमध्ये (Jail) घुसला आहे. चीनच्या 2 जेलमधील कैद्यांना कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे. तब्बल 234 जणांना कोरोनाव्हायरस झाला आहे. जेलमध्ये कोरोनाव्हायरसचा उद्रेक झाल्याने संबंधित अधिकाऱ्यांची नोकरी गेली आहे.

रॉयटर्सने (Reuters) दिलेल्या वृत्तानुसार, चीनच्या 2 तुरुंगामध्ये 234 जणांना कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे. शानडोंग (Shandong) आणि झेजियांग (Zhejiang) प्रांतातील जेलमध्ये कोरोनाव्हायरसची प्रकरणं दिसून आलीत. तुरुंगात कोरोनाव्हायरस पसरण्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदार ठरवून त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आहे, अशी माहिती प्रशासनाने शुक्रवारी दिली. तर हुबेई डेली न्यूजपेपरने दिलेल्या माहितीनुसार हुबेई प्रांतातील 2 तुरुंगातही कोरोनाव्हायरसची एकूण 271 प्रकरणं आढळून आलीत. या वुहानच्या 230 महिला कैद्यांचा समावेश आहे.

हेदेखील वाचा - सॅल्युट ! अवघ्या 7 महिन्यांच्या जीवाने दिली 'कोरोना'ला टक्कर, संपूर्ण जगाला दहशतीत ठेवणाऱ्या व्हायरसला हरवलं

अधिकाऱ्यांना नोकरीवरून काढलं

शानडोंगच्या जिनिंग शहरातील (Jining city) रेनचेंग जेलमध्ये (Rencheng prison) तब्बल 207 जणांना कोरोनाव्हायरसची लागण झाली. 13 फेब्रुवारीला या जेलच्या तुरुंग अधिकाऱ्यांना कोरोनाव्हायरसची लागण झाल्याचे निदान झालं होतं. मात्र व्हायरसचा उद्रेक होण्यात अधिकारी जबाबदार असल्याचं प्रशासनाने म्हटलं. त्यामुळे शानडोंगमधील प्रांतीय न्याय विभागप्रमुखांसह (chief of the provincial justice department in Shandong) 7 अधिकाऱ्यांनाही नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आहे, अशी माहिती प्रशासनाने प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

शानडोंग प्रांताचे डेप्युटी सेक्रेटरी जनरल यु चेंगे यांनी सांगितलं की, “जेलमध्ये कोरोनाव्हायरसचा उद्रेक झाला. याचा अर्थ काही विभागांनी त्यांच्या जबाबदाऱ्या नीट पार पाडल्या नाहीत, त्यांचं कामकाज नीट नव्हतं आणि आजाराला प्रतिबंध करण्यासाठी त्यांनी योग्य उपाययोजना केल्या नाहीत”

शानडोंग, झेजियांगनंतर हुबेई प्रांतानेही जेलमधील कैद्यांना कोरोना झाल्याचं सांगितलं. कोरोनाव्हायरसवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरल्याने महिला तुरुंगाच्या अधिकाऱ्यालाही काढून टाकण्यात आलं आहे.

हेदेखील वाचा - भयंकर ! कोरोना फुफ्फुसांची अक्षरश: लावतोय वाट; X-ray पाहाल तर बसेल धक्का

तुरुंगात उपचाराची सोयीसुविधा

शानडोंगच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं की, कोरोनाव्हारसच्या रुग्णांवर जिनिंगममध्ये एका रुग्णालयात उपचार केले जात आहेत. तसंच तुरुंगातही उपचारासाठी सोयीसुविधा पुरवण्यात आल्यात. चीनमध्ये आतापर्यंत एकूण 2,100 पेक्षा जास्त रुग्णांचा कोरोनाव्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. तर 74,000 जणांचा याची लागण झाली आहे. हुबेई प्रांत आणि त्यातही वुहानमध्ये सर्वाधिक प्रकरणं आहेत.

First published:

Tags: China, Coronavirus, Jail