'कोरोना'पासून कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी रेल्वेनं असं केलं प्लॅनिंग!

'कोरोना'पासून कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी रेल्वेनं असं केलं प्लॅनिंग!

साथीच्या आजारामुळे रेल्वेच्या दोन कर्मचार्‍यांच्या निधनानंतर हे मार्गदर्शक तत्त्व काही झोनमध्ये आधीच लागू करण्यात आले आहे.

  • Share this:

प्रशांत लीला रामदास,प्रतिनिधी

नवी दिल्ली, 10 एप्रिल : रेल्वेने आपल्या कर्मचार्‍यांना कोरोना विषाणूच्या संसर्गापासून वाचवण्यासाठी एक मार्गदर्शक तत्त्व तयार केले आहे. ज्यात सर्व 13 लाख कर्मचार्‍यांची माहिती गोळा करणे आणि त्या सर्वांसाठी संभाव्य विलगीकरण सुविधा निश्चित करण्यासाठी सूचना  देण्याची  यंत्रणा उभारली आहे.

कागदपत्रात कर्मचार्‍यांना सुरक्षित ठेवण्यासाठी झोन रेल्वेने  मार्गदर्शक सूचनांची यादी दिली आहे. रेल्वेचे सर्व 17 झोन सुचविलेल्या उपायांच्या अंमलबजावणीची तयारी करीत आहेत. रेल्वे देशातील सर्वात मोठी कर्मचारी असलेली संस्था आहे.  देशात आतापर्यंत 6 हजारापेक्षा जास्त लोकांना या विषाणूची लागण झाली आहे.  कमीतकमी 199 लोकं मरण पावले आहेत. त्यामुळे या सूचनेची गंभीरपणे दखल घेण्याचा आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.

हेही वाचा -'लॉकडाऊनमध्ये गरीबाच्या पोटाला नाही घास, मात्र श्रीमंतांना सहलीला मिळतोय पास'

कागदपत्रानुसार संबंधित विभाग / कार्यशाळा / मुख्यालयातील सर्व कर्मचार्‍यांची माहिती गोळा केली जाणार आहे. या अंतर्गत कर्मचार्‍यांचे नाव, सद्य निवासी पत्ता, फोन नंबर अशा प्रकारे ठेवला पाहिजे की, त्यांच्याशी कधीही संपर्क साधता येईल. याव्यतिरिक्त, प्रत्येक कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी संभाव्य विभाजन केंद्र निश्चित करण्याचे काम करण्याच्या पूर्ण करण्यास सांगितले आहे.

हेही वाचा -WhatsApp ग्रुप Admin अ‍ॅडमिन असणाऱ्यांनो, सावधान! मुंबई पोलिसांचा नवा आदेश जारी

साथीच्या आजारामुळे रेल्वेच्या दोन कर्मचार्‍यांच्या निधनानंतर हे मार्गदर्शक तत्त्व काही झोनमध्ये आधीच लागू  करण्यात आले आहे. सर्व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना कर्मचार्‍यांची नेहमीच पूर्ण माहिती ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या व्यतिरिक्त, त्यांना निरोगी कर्मचारी आणि स्वयंसेवकांचा डेटाबेस तयार करण्यास सांगितले गेले आहे. या मार्गदर्शनामध्ये (प्रोटोकॉल) असे नमूद केले आहे की, आधीपासून आजारी असलेल्या कर्मचारी  आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे,अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: April 10, 2020, 5:34 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading