WhatsApp ग्रुप Admin अ‍ॅडमिन असणाऱ्यांनो, सावधान! मुंबई पोलिसांचा नवा आदेश जारी

WhatsApp ग्रुप Admin अ‍ॅडमिन असणाऱ्यांनो, सावधान! मुंबई पोलिसांचा नवा आदेश जारी

चुकीचे मेसेजेस, अफवा पसरू नये, म्हणून मुंबई पोलिसांकडून ही खबरदारी घेतली जात आहे

  • Share this:

मुंबई, 10 एप्रिल :  कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाहाकार उडाला आहे. भारतातही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. पण, त्याहून चिंतेची बाब म्हणजे सोशल मीडियावरून चुकीचे मॅसेज पसरवले जात आहे. त्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे. याला आळा घालण्या साठी मुंबई पोलिसांनी कडक पावलं उचलली आहे.

मुंबई पोलील शहर पोलीस उपायुक्त प्रणय अशोक यांनी एक पत्रक काढले आहे. या पत्रकानुसार, एखाद्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर जर कुणी कोरोनासंदर्भात चुकीचा मॅसेज पाठवला तर त्यासाठी अ‍ॅडमिनलाच जबाबदार धरले जाणार आहे. त्यामुळे अ‍ॅडमिनने ग्रुप लॉक करून सर्व अधिकार आपल्याच ताब्यात घेतले पाहिजे, अशी स्पष्ट सूचना मुंबई पोलिसांकडून करण्यात आली आहे. 10 एप्रिल ते 24 एप्रिलपर्यंत हे पत्रक लागू राहणार आहे.

हेही वाचा - लॉकडाऊनसंदर्भात रविवारी घेणार मोठा निर्णय, महत्त्वपूर्ण घोषणा करण्याची शक्यता

चुकीचे मेसेजेस, अफवा पसरू नये, म्हणून मुंबई पोलिसांकडून ही खबरदारी घेतली जात आहे. त्यासोबतच  ट्विटर, फेसबुक, टिकटॉक आणि इन्स्टाग्राम सारख्या सोशल प्लॅटफॉर्मला देखील हे नियम लागू असणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबद्दल सोशल मीडियावर चुकीचे मॅसेज पसरवले जात असल्याचं समोर आलं आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागात या प्रकरणी व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅडमिनसह सदस्यांना अटकही करण्यात आली आहे. परंतु, तरीही काही महाभागांकडून चुकीचे मेसेज पाठवण्याचे प्रकार सुरूच आहे.

हेही वाचा - धारावी कोरोनाचा हॉटस्पॉट, पोलिस स्टेशनबाहेर उभारला पहिला 'सॅनिटायझेशन टेंट'

राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या, ध्येयधोरणाच्या विरोधात चुकीचे मेसेज पसरवू नये. कोरोना व्हायरस पसरेल किंवा सार्वजनिक आरोग्य, सार्वजनिक सुरक्षा धोक्यात येईल, असे कोणता प्रकार जर आढळून आला तर संबंधित व्यक्ती आणि ग्रुप अ‍ॅडमिनवर थेट फौजदारी कारवाई केली जाणार आहे, असं या पत्रकात स्पष्ट करण्यात आलं आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: April 10, 2020, 4:54 PM IST
Tags:

ताज्या बातम्या