जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / 'अज्ञात आजार घेईल कोट्यवधी लोकांचा जीव', तज्ज्ञांनी 7 महिन्यांपूर्वीच केलं होतं सावध

'अज्ञात आजार घेईल कोट्यवधी लोकांचा जीव', तज्ज्ञांनी 7 महिन्यांपूर्वीच केलं होतं सावध

'अज्ञात आजार घेईल कोट्यवधी लोकांचा जीव', तज्ज्ञांनी 7 महिन्यांपूर्वीच केलं होतं सावध

द ग्लोबल प्रिपेयर्डनेस मॉनिटरिंग बोर्डने (The Global Preparedness Monitoring Board) गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आपला पहिला वार्षिक अहवाल दिला होता आणि त्यामध्येच भविष्यातील अज्ञात आजाराच्या संकटाबाबत जगाला सावध केलं होतं.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 22 एप्रिल : सध्या संपूर्ण जग कोरोनाव्हायरसशी (Coronavirus) दोनहात करतो आहे. मात्र एका अज्ञात अशा आजाराचं संकट जगावर आहे, असा इशारा तज्ज्ञांनी 7 महिन्यांपूर्वीच दिला होता. इन्डेपेन्डन्ट मध्ये हे वृत्त देण्यात आलं आहे. द ग्लोबल प्रिपेयर्डनेस मॉनिटरिंग बोर्डने (The Global Preparedness Monitoring Board) संस्थेनं गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आपला पहिला वार्षिक अहवाल दिला होता आणि त्यामध्येच भविष्यातील अज्ञात आजाराच्या संकटाबाबत जगाला सावध केलं होतं. आफ्रिकामध्ये इबोला आजार पसरल्यानंतर वर्ल्ड बँक आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी ही समिती गठीत केली होती. हे वाचा -  खूशखबर! भारतासमोर कोरोनाचा लागत नाहीये टिकाव, कमजोर पडतोय व्हायरस जीपीएमबीने आपल्या या रिपोर्टमध्ये म्हटलं होतं, “संपूर्ण जगावर महासाथीचं संकट आहे. विमानामार्फत हा आजार दुसऱ्या देशांमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांच्या माध्यमातून पसरेल. पाहतात पाहता संपूर्ण जगात पसरेल आणि त्यापासून वाचणं अशक्य होईल. हा आजार फक्त झपाट्याने पसरणार नाही, तर 5 ते 8 कोटी लोकांचा जीव घेईल” “शिवाय यामुळे मोठ्या संख्येने लोकांचा मृत्यू होईलच शिवाय अर्थव्यवस्थेवर दुष्परिणाम होईल, राष्ट्रीय सुरक्षा अस्थिर होईल. जगातील 5 टक्के अर्थव्यवस्था कोलमडेल. अशा परिस्थितीत इच्छाशक्ती आणि नेतृत्वाची गरज असेल. अशा वाईट परिस्थितीशी सामाना करण्यासाठी देशांनी तयार राहायला हवं”, असंही या समितीनंं म्हटलं होतं. हे वाचा -  लॉकडाउनमुळे उडाली झोप? या दिवसात तुम्हालाही झोपेच्या समस्या असतील तर करा हे उपाय तेव्हा या अज्ञात आजाराला तज्ज्ञांनी डिसीज एक्स म्हटलं होतं. आपल्याला आता याबाबत जास्त काही माहिती नसल्याचंही त्यांनी सांगितलं, मात्र जगावर हे संकट येणार हे पक्कं आहे, असं त्यांनी नमूद केलं होतं. सप्टेंबरमध्ये जेव्हा हा रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला तेव्हा त्याच्याकडे फारसं लक्ष देण्यात आलं नाही आणि आता मात्र अशाच आजाराला संपूर्ण जग सामोरं जात आहे. संकलन, संपादन - प्रिया लाड

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात