Home /News /national /

...तर पावसाळ्यात 5 पट जास्त होणार कोरोनाचा प्रसार! IIT चा भीती वाढवणारा रिसर्च

...तर पावसाळ्यात 5 पट जास्त होणार कोरोनाचा प्रसार! IIT चा भीती वाढवणारा रिसर्च

पाऊसमान चांगलं असंल तर सर्वसाधारणपणे ऑगस्ट महिन्यात राज्यातली बहुतांश धरणं भरून वाहू लागतात आणि सांगली, कोल्हापूरसारख्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होते.

पाऊसमान चांगलं असंल तर सर्वसाधारणपणे ऑगस्ट महिन्यात राज्यातली बहुतांश धरणं भरून वाहू लागतात आणि सांगली, कोल्हापूरसारख्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होते.

कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात असा अंदाज वर्तविला जात होता की उन्हाळ्यात गर्मीमुळं कोरोना नष्ट होईल, मात्र असे काही घडले नाही.

    मुंबई, 10 जून : देशात कोरोनाबाधितांचा (Coronavirus) आकडा झपाट्यानं वाढत आहे. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात असा अंदाज वर्तविला जात होता की उन्हाळ्यात गर्मीमुळं कोरोना नष्ट होईल, मात्र असे काही घडले नाही. आता या सगळ्यात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने (IIT) मुंबईनं कोरोनाचा संसर्ग आणि हवामानातील बदलाचा अभ्यास केला आहे. या अभ्यासामध्ये असे नोंदवले गेले आहे की पावसाळ्यात कोरोनाचा संसर्ग अधिक वेगानं होण्याची शक्यता आहे. अभ्यासानुसार आर्द्रता वाढल्यास कोरोना जास्त काळ वातावरणात राहू शकतो. आयआयटी बॉम्बेचे प्राध्यापक रजनीश भारद्वाज आणि अमित अग्रवाल यांनी कोरोनाव्हायरसवर अभ्यास केला आहे. दोन्ही प्राध्यापकांनी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या शिंकेतून निघणाऱ्या ड्रॉपलेटचा अभ्यास केला. त्यानंतर या ड्रॉपलेटच्या कोरड्या होण्याच्या गतीची आणि जगातील 6 शहरांमध्ये दररोज होणाऱ्या संसर्गाची तुलना केली. रजनीश भारद्वाज यांना असे आढळले की कोरड्या वातावरणापेक्षा आर्द्रता क्षेत्रात विषाणूचा अस्तित्व दर 5 पट जास्त आहे. अशा परिस्थितीत लवकरच मुंबईत मान्सून धडकणार आहे, त्यामुळं कोरोनाचा धोका अधिक आहे. वाचा-6 महिन्यात पहिल्यांदाच कोरोनाबाबत आली दिलासादायक आकडेवारी पावसाळ्यात आर्द्रतेचे प्रमाण 80 टक्क्यांहून अधिक आहे. अशा परिस्थितीत पावसाळ्यात कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाण जास्त वेगाने वाढू शकतो. प्राध्यापक अमित अग्रवाल म्हणाले की, जर आर्द्रतेमुळे कोरोना विषाणूचा संसर्ग जास्त काळ टिकून राहिला तर मुंबई, केरळ आणि गोवा यासारख्या राज्यांत येणाऱ्या काळात परिस्थिती आणखी बिकट होईल. दरम्यान, बरेच लोक या अभ्यासाशी सहमत नाहीत. वाचा-कधी संपणार कोरोनाचा प्रभाव? 511 तज्ज्ञांनी 'या' संशोधनातून दिलं उत्तर भारतात निरोगी रुग्णांच्या संख्येत वाढ भारतात सध्या 1 लाख 33 हजार 632 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. तर, 1 लाख 35 हजार 205 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. भारतात 30 जानेवारी रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर पहिल्यांदाच निरोगी रुग्णांची संख्या जास्त झाली आहे. मुख्य म्हणजे भारताचा मृत्यूदर कायम कमी राहिला आहे. भारतात एकूण कोरोना रुग्णांची संख्या जास्त असली तरी, मृतांचा आकडा कमी आहे. भारतात आतापर्यंत 7745 लोकांचा मृत्यू झाला आहे. भारताचा मृत्यूदर 2.80% आहे. जगातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीत भारत सध्या सहाव्या क्रमांकावर आहे. अमेरिका, ब्राझील, रशिया, ब्रिटन, स्पेन यांच्यानंतर भारताचा क्रमांक लागतो. मात्र भारताचा मृत्यूदर रशिया वगळता इतर सर्व देशांपेक्षा कमी आहे. रशियाचा मृत्यूदर 1.27% आहे. वाचा-एप्रिलमध्ये कोरोनामुक्त झालेल्या 'या' 5 राज्यांमध्ये पुन्हा वाढले रुग्ण संकलन, संपादन-प्रियांका गावडे
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Corona, Corona virus in india

    पुढील बातम्या