Home /News /national /

कधी संपणार कोरोनाचा प्रभाव? 511 तज्ज्ञांनी 'या' संशोधनातून दिलं उत्तर

कधी संपणार कोरोनाचा प्रभाव? 511 तज्ज्ञांनी 'या' संशोधनातून दिलं उत्तर

याद्वारे, कोरोनानंतर लोकांच्या आयुष्यावर काय परिणाम होईल हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

    वॉशिंग्टन, 10 जून : जगभरात कोरोनाचा उद्रेक वाढत आहेत. यातच जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO), जगात कोरोनाव्हायरसचं संकट वाढत असल्याचं सांगितले आहे. एकीकडे, जेथे बऱ्याच देशांनी कोरोनावर मात करण्यास सुरुवात केली आहे. तर, अनेक देश असेही आहेत जिथं प्रकरणं वाढत आहेत. यात काही तज्ज्ञांनी कोरोना कधी नष्ट होणार याबाबत माहिती दिली आहे. अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाइम्स या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार 511 तज्ज्ञांनी एक सर्वेक्षण केले. याद्वारे, कोरोनानंतर लोकांच्या आयुष्यावर काय परिणाम होईल हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे. अहवालानुसार या तज्ज्ञांनी कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली नाहीत, परंतु लोकांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी सांगितले आहे. रिपोर्टनुसार, 41 टक्के लोकांनी सांगितले की म्हणाले की लवकरच ते सलून किंवा पार्लरमध्ये जातील. तर39 टक्के लोक म्हणाले की, ते 3 ते 12 महिन्यांपर्यंत जाणार नाहीत. त्याचवेळी, 16 टक्के लोकांनी असे म्हटले आहे की, ते आता 1 वर्षानंतरच सलूनमध्ये जातील. तर 1 टक्के लोकांनी ते कधी केस कापणार हे माहित नाही. संभाव्य सुट्टीवर जाण्याबाबतच्या प्रश्नावर 56 टक्के लोक म्हणाले की, ड्रायव्हिंग डिस्टन्स पाळून सुट्टीवर जाऊ, त्याच वेळी, 26 टक्के म्हणाले की सुट्टीवर जाण्यासाठी 3 ते 12 महिने लागू शकतात, तसेच 18 टक्के म्हणाले की ते एका वर्षानंतरच सुट्टीवर जातील. वाचा-एप्रिलमध्ये कोरोनामुक्त झालेल्या 'या' 5 राज्यांमध्ये पुन्हा वाढले रुग्ण या उन्हाळ्यात 60 टक्के लोक फक्त डॉक्टरांकडे जाणार डॉक्टरांकेड जाण्याबाबतच्या प्रश्नावर 60 टक्के लोक म्हणाले की या उन्हाळ्यात ते फक्त डॉक्टरांना भेटतील. त्याच वेळी, 29 टक्के म्हणाले की हे करण्यासाठी त्यांना 3 ते 12 महिने लागतील, तर 11 टक्के म्हणाले की ते एका वर्षानंतर डॉक्टरांना भेटतील. तसेच, 1 टक्क्यांपेक्षा कमी लोकांनी असे सांगितले की आता ते कधीही डॉक्टरांना भेटणार नाहीत. तसेच, लोकांना भेटत असताना खबरदारी घेण्याबाबत, 64 टक्के लोक म्हणाले की ते कोणत्याही प्रकारच्या सावधगिरीशिवाय लोकांना भेटतील. त्याच वेळी, 16 टक्के म्हणाले की त्यांना असे करण्यास 3 ते 12 महिने लागू शकतात. तसेच, 17 टक्के म्हणाले की ते 1 वर्षापेक्षा जास्त काळ सावधगिरी बाळगतील. तसेच 3 टक्के लोकांनी असे सांगितले की आता तो कोणत्याही सावधगिरीशिवाय कोणालाही भेटणार नाही. वाचा-धक्कादायक! कोरोनानं घेतला देशात पहिला आमदाराचा बळी, वाढदिवशीच झाला मृत्यू कोरोनानंतर असे असणार लोकांचे आयुष्य डिनर पार्टीबाबत लोकांना विचारले असता, 46 टक्के लोकांनी ते 3 ते 12 महिन्यांनंतर पार्टी करतील असे सांगितले. तर 32 टक्के लोक म्हणाले की ते उन्हाळ्यात एक लहान डिनर पार्टी करतील. त्याच वेळी, 21 टक्के म्हणाले की एक वर्षा ते असं काही करणार नाही. तसेच, हवाई प्रवासाच्या प्रश्नावर 20 टक्के लोक म्हणाले की, उन्हाळ्यात ते हवाई प्रवास करतील, तर 44 टक्के लोक म्हणाले की, 3 ते 12 प्रवास करतील. 37 टक्के लोक असं म्हणाले की, ते एका वर्षानंतरच प्रवास करतील. वाचा-झुंज अखेर अपयशी, कोरोनामुळे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक मुकुंद केणी यांचं निधन संकलन, संपादन-प्रियांका गावडे.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Corona, Corona virus in india

    पुढील बातम्या