Home /News /national /

घरवापसीमुळं लागली वाट! एप्रिलमध्ये कोरोनामुक्त झालेल्या 'या' 5 राज्यांमध्ये पुन्हा वाढले रुग्ण

घरवापसीमुळं लागली वाट! एप्रिलमध्ये कोरोनामुक्त झालेल्या 'या' 5 राज्यांमध्ये पुन्हा वाढले रुग्ण

या पाच राज्यांमध्ये गेल्या 9 दिवसांत 1134 नवीन रुग्ण सापडले आहेत. ही संख्या वाढण्याचीही शक्यता आहे.

    नवी दिल्ली, 10 जून : देशात कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाख 76 हजारहून अधिक झाला आहे. गेल्या 24 तासांत जवळजवळ 10 हजार नवीन प्रकरणं समोर आली आहेत. तर, 241 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे देशातील पाच राज्य एप्रिलमध्ये कोरोनामुक्त झाली होती, मात्र मेमध्ये पुन्हा या राज्यांमध्ये कोरोनानं शिरकाव केला. कोरोनामुक्त झालेल्या या पाच राज्यांमध्ये अरुणाचल प्रदेश, गोवा, मणिपुर, त्रिपुरा यांचा समावेश आहे. या राज्यांमध्ये प्रवासी मजूर आणि घरी परतलेल्या लोकांमुळं कोरोनाचा पुन्हा शिरकार झाला. अरुणाचल प्रदेशमध्ये 1 एप्रिल रोजी कोरोनाचं एकच रुग्ण होता. जो 17 एप्रिल रोजी उपचारानंतर बराही झाला. यानंतर अरुणाचल 17 एप्रिललाच कोरोना फ्री झाल्याचं घोषित करण्यात आलं. यानंतर काही दिवसातच गोवा, मणिपूर, त्रिपुरा आणि मिझोरम येथे पूर्ण उपस्थित कोरोना संसर्ग झाल्यानंतर कोरोना मुक्त झाले. मात्र 1 मे पासून स्थलांतरित मजूर आणि लोकं घरी परतू लागले. परिणामी या पाचपैकी चार राज्यांमध्ये कोरोनाचा पुन्हा प्रसार झाला. वाचा-VIDEO : Unlock 1 मध्ये मोठी कारवाई, , 8.5 कोटींच्या दारूवर फिरवला बुलडोजर 9 दिवसात मिळाले 1134 नवीन रुग्ण या पाच राज्यांमध्ये गेल्या 9 दिवसांत 1134 नवीन रुग्ण सापडले आहेत. ही संख्या वाढण्याचीही शक्यता आहे. दिलासादायक बाब म्हणजे या पाच राज्यांमध्ये कोरोनामुळं एकाचाही मृत्यू झाल्याची नोंद नाही आहे. वाचा-धक्कादायक! कोरोनानं घेतला देशात पहिला आमदाराचा बळी, वाढदिवशीच झाला मृत्यू असा आहे या राज्यांचा ग्राफ >>अरुणाचल प्रदेश: 1 एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. 17 एप्रिल रोजी राज्य कोरोनामुक्त झालं. 24 मे रोजी पुन्हा कोरोना रुग्ण समोर आला. 9 दिवसात 53 नवीन रुग्ण सापडले. >>गोवा: 25 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. 19 एप्रिल रोजी गोवा कोरोनामुक्त झालं. मात्र 14 मे रोजी पुन्हा कोरोनाचा रुग्ण सापडला. त्यानंतर 31 मेपर्यंत राज्यात 70 कोरोनाबाधित होते. आतापर्यंत राज्यात 260 रुग्ण आहेत. >>मणिपुर: 23 मार्च रोजी मणिपूरमध्ये पहिला कोरोना रुग्ण सापडला. 20 एप्रिल रोजी राज्या कोरोनामुक्त असल्याचं घोषित करण्यात आलं. त्यानंतर 14 मे रोजी पुन्हा संक्रमण होण्यास सरुवात झाली. आता सध्या राज्याच 210 कोरोनाबाधित आहेत. >>त्रिपुरा: राज्यात 6 एप्रिल रोजी पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर 23 एप्रिल रोजी राज्य कोरोनामुक्त झालं. मात्र 2 मे रोजी पुन्हा कोरोनाचा प्रसार झाला. आता राज्यात 570 कोरोनाबाधित आहेत. >> मिझोरम: 24 मार्च रोजी राज्यात कोरोनाचं पहिलं प्रकरण समोर आलं. 27 एप्रिल रोजी राज्य कोरोनामुक्त झाल्याचे जाहीरही करण्यात आले. मात्र 1 जूनला पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला. सध्या राज्यात 41 कोरोना रुग्ण आहेत. वाचा-झुंज अखेर अपयशी, कोरोनामुळे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक मुकुंद केणी यांचं निधन महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा होणार 1 लाख पुढच्या तीन दिवसात महाराष्ट्रात कोरोनाव्हायरची प्रकरणं 1 लाखपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात 91 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. राज्यात रोज तीन हजार नवीन प्रकरणं समोर येत आहेत. संपादन, संकलन-प्रियांका गावडे.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Corona, Corona virus in india

    पुढील बातम्या