भारतीयांनी करून दाखवलं! 6 महिन्यात पहिल्यांदाच कोरोनाबाबत आली दिलासादायक आकडेवारी

भारतीयांनी करून दाखवलं! 6 महिन्यात पहिल्यांदाच कोरोनाबाबत आली दिलासादायक आकडेवारी

भारतात सध्या 1 लाख 33 हजार 632 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. तर, 1 लाख 35 हजार 205 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 10 जून : भारतात कोरोबाधितांचा आकडा वाढत असला तरी आज पहिल्यांदाच एक चांगली बातमी आली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, 24 तासांत भारतात 9985 नवीन रुग्ण सापडले. तर, 279 लोकांचा मृत्यूही झाला. यासह भारतात कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाख 76 हजार 583 झाला आहे. मात्र याशिवाय पहिल्यांच भारतातील निरोगी रुग्णांची संख्या ही सक्रिय रुग्णांपेक्षा जास्त आहे.

भारतात सध्या 1 लाख 33 हजार 632 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. तर, 1 लाख 35 हजार 205 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. भारतात 30 जानेवारी रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर पहिल्यांदाच निरोगी रुग्णांची संख्या जास्त झाली आहे. मुख्य म्हणजे भारताचा मृत्यूदर कायम कमी राहिला आहे. भारतात एकूण कोरोना रुग्णांची संख्या जास्त असली तरी, मृतांचा आकडा कमी आहे. भारतात आतापर्यंत 7745 लोकांचा मृत्यू झाला आहे. भारताचा मृत्यू दर 2.80% आहे.

जगातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीत भारत सध्या सहाव्या क्रमांकावर आहे. अमेरिका, ब्राझील, रशिया, ब्रिटन, स्पेन यांच्यानंतर भारताचा क्रमांक लागतो. मात्र भारताचा मृत्यूदर रशिया वगळता इतर सर्व देशांपेक्षा कमी आहे. रशियाचा मृत्यूदर 1.27% आहे.

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा होणार 1 लाख

पुढच्या तीन दिवसात महाराष्ट्रात कोरोनाव्हायरची प्रकरणं 1 लाखपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात 91 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. राज्यात रोज तीन हजार नवीन प्रकरणं समोर येत आहेत.

First published: June 10, 2020, 10:46 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading