फिरोजाबाद, 03 मे : देशभरात कोरोना व्हायरसमुळे 17 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे अनेकांचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. तर कामधंदेही बंद झाल्यानं रोजगार नाहीत. हातावर पोट असणाऱ्यांवर उपासमारीची वेळ येत आहे. लॉकडाऊनमध्ये सर्वात जास्त अडचणींचा सामना हा वृद्ध आणि गरिबांना करावा लागत आहे. दोन वेळच्या खाण्यांची भ्रांत असल्यानं जगायचं कसं हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. याच दरम्यान एका गरीब वृद्ध महिलेला सरकारी जनधन योजनेतून खात्यावर 500-500 रुपये मदत आल्याची माहिती दिली. पोटातील भुकेची आग विझवण्यासाठी या वृद्ध महिलेनं बँकेतून हे 500 रुपये काढून सामान घेण्याचं ठरवलं.
फिरोजाबाद इथल्या पचोखरा गावात 72 वर्षांच्या महिलेनं हे पैसे काढण्यासाठी रात्रभर 50 किलोमीटर पायी चालून प्रवास केला. शनिवारी सकाळी ही महिला टुंडला इथल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत पोहोचली. तिथे गेल्यावर महिलेनं आपली हकीगत सांगितली. बँकेतील कर्मचाऱ्यानं दिलेली माहिती ऐकून महिलेनं कपाळावर हात मारला. वृद्ध महिलेला काय करावं हे सुचेना.
हे वाचा-करदात्यांना आयकर विभागाने पाठवला अलर्ट! होऊ शकतं मोठं नुकसान,वाचा काय आहे प्रकरण
रात्रभर 50 किलोमीटर चालून 500 रुपये काढण्यासाठी आलेल्या या वृद्धेच्या खात्यावर पैसे आलेच नव्हते अशी माहिती बँकेच्या कर्मचाऱ्यानं दिली. हशात आणि निराशा पदरात घेऊन ही महिला पुन्हा आपल्या गावी जाण्यासाठी निघाली. अमर उजालाने दिलेल्या वृत्तानुसार फिरोजाबादमधील एका छोट्याशा गावात ही महिला राहाते. राधा पत्नी हरवीर असं या महिलेचं नाव आहे.
हे वाचा-पगार मिळाला नाही म्हणून डिप्रेशनमध्ये 22 वर्षीय तरुणानं उचललं टोकाचं पाऊल