जाहिरात
मराठी बातम्या / देश / धक्कादायक! पगार मिळाला नाही म्हणून डिप्रेशनमध्ये 22 वर्षीय तरुणानं उचललं टोकाचं पाऊल

धक्कादायक! पगार मिळाला नाही म्हणून डिप्रेशनमध्ये 22 वर्षीय तरुणानं उचललं टोकाचं पाऊल

धक्कादायक! पगार मिळाला नाही म्हणून डिप्रेशनमध्ये 22 वर्षीय तरुणानं उचललं टोकाचं पाऊल

लॉकडाऊनमध्ये काम बंद झालं आहे. त्यामुळे पगार मिळणार नाही अशी भीती असल्याने तरुणाने हे टोकाचं पाऊल उचललं

  • -MIN READ
  • Last Updated :

अलीगढ, 3 मे : उत्तर प्रदेशातील अलीगढ जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये डिप्रेशनमध्ये (depression) येऊन एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या (Sucide) केली. या घटनेमुळे या तरुणाच्या कुटुंबीयांना जबरदस्त धक्का बसला आहे. या घटनेच्या सूचनेनंतर पोलीस घटनास्थळी हजर झाले. त्यांनी तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. लॉकडाऊनमुळे पगार मिळाली नाही अलीगढ जिल्ह्यातील ठाणे सिव्हिल लाइन परिसरात आलमबाग निवासी 22 वर्षीय मोहम्मद हैदर नावाच्या तरुणाने लॉकडाऊनमध्ये आत्महत्या केली. कुटुंबीयांनी सांगितल्यानुसार हैदर आपल्या आईसोबत राहत होता. बहिणींची लग्न झाली आहेत. सध्या रमजानमध्ये बहीण घरी आली होती. मृत तरुणाच्या बहिणीने सांगितले की, लॉकडाऊनदरम्यान मोहम्मदने अनेकदा आईला आपल्या समस्या सांगितल्या होत्या. तो सतत म्हणत होता की त्याला कामातून पैसे दिले जाणार नाही. कुटुंबीयांनुसार मोहम्मद हैदर अल्लाना मीट कारखान्यात काम करीत होता. सकाळी 10 वाजेपर्यंत दारचं नाही उघडलं मृत तरुण हैदर याचे मामा राशिद यांनी सांगितले की, लॉकडाऊननंतर तो घरी होता. कामावरुन पैसे मिळणार की नाही याचा सतत विचार करीत असायचा. मोहम्मद वरच्या खोलीत झोपायचा. सकाळी 10 वाजले तरी तो खोलीबाहेर येत नसल्याने कुटुंबीय चिंताग्रस्त झाले होते. अखेर शेजारच्या घराच्या खिडकीतून पाहिलं तर मोहम्मद गळफास घेऊन आत्महत्या केली. यावर अलीगडचे समाजवादी पक्षाचे माजी आमदार हाजी जमीरुल्लाह यांनी सांगितले की तो डिप्रेशनमध्ये होता. लॉकडाऊनमुळे कामावर परिणाम होत असल्याने तो चिंतेत होता. लॉकडाऊनचा कालावधी वाढल्याने तो हताश झाला होता. त्यातच त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: sucide
  • First Published :
जाहिरात
जाहिरात