Home /News /maharashtra /

गर्दीत कसा ओळखणार कोरोनाबाधित? सेनेच्या नगरसेवकाने सुचवला रामबाण उपाय

गर्दीत कसा ओळखणार कोरोनाबाधित? सेनेच्या नगरसेवकाने सुचवला रामबाण उपाय

गर्दीत ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे असे रुग्ण, क्वारंटाइन रुग्ण आणि ज्यांना होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे, अशांची ओळख पटवणे कठीण झाले आहे.

डोंबिवली, 13 जून :  कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.अनलॉक वन सुरू झाल्यापासून सर्वत्र लोकांची गर्दी दिसत आहे. या गर्दीमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण, संशयित आणि होम क्वारंटाइन रुग्ण ओळखणं कठीण होत चालले आहे. त्यावर पालिकेनं आता टॅगचा तोडगा काढला आहे. शुक्रवारी कल्याण डोंबिवलीच्या परिसरात एकाच दिवशी तब्बल 185 रुग्ण आढळून आहे, त्यामुळे कल्याण-डोंबिवलीत एकच खळबळ उडाली आहे. कल्याण-डोंबिवली परिसरातून मोठ्या प्रमाणात नोकरदार वर्ग हा मुंबईला ये जा करत असतो. त्यात रेल्वे बंद असल्यामुळे बस वाहतुकीसाठी एकच गर्दी उसळली आहे. परंतु, या गर्दीत ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे असे रुग्ण, क्वारंटाइन रुग्ण आणि ज्यांना होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे, अशांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. हेही वाचा-मोठा कट उधळला, रात्रभरापासून सुरू असलेल्या चकमकीत 4 दहशतवादी ठार अशा रुग्णांची ओळख पटली तर इतर नागरिक त्यांच्यापासून सुरक्षित अंतर ठेवून शकतात. याकरिता शिवसेना नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी केडीएमसी पालिकेला तब्बल 10,000 हजार वॉटरप्रूफ टॅग तयार करून दिले आहेत. हे टॅग लावल्यानंतर शिक्के मारणं बंद करता येईल. हे टॅग एकदाच वापरता येणारे आहेत. तसेच त्याच्याशी छेडछाड करता येणार नाही. फक्त कट करून काढता येतील. हे 3 प्रकारचे टॅग असून लाल रंगाचा टॅग हा पॉझिटिव्ह रुग्णासाठी असेल. जे रुग्ण संशयित असतील त्यांना केसरी रंगाचा टॅग आणि जे होम क्वारंटाइन आहे त्यांच्यासाठी पिवळा रंगाचा टॅग असणार आहे. हेही वाचा-आधी ठाकरे सरकारवर नाराजी, आता काँग्रेसचे मंत्री थोरात कोकण दौऱ्यावर! या टॅगचा पालिका कशा पद्धतीने वापर करते आणि कल्याण-डोंबिवलीकर नागरिक यांचा योग्य प्रकार वापर करता का हे पाहण्याचं ठरणार आहे. संपादन - सचिन साळवे
Published by:sachin Salve
First published:

Tags: Shiv sena

पुढील बातम्या