विविध राज्यात अडकलेल्या लोकांना त्यांच्या राज्यात पोहोचवण्यासाठी रेल्वे सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र या प्रवासात कोरोनाव्हायरसचा धोकाही आहे.
सेंट्रलाइज एसीमध्ये कोरोनाव्हायरस संक्रमणाचा धोका जास्त आहे, असं अनेक अभ्यासात दिसून आलं आहे, त्यामुळे आवश्यक ती सर्व खबरदारी घ्या.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे मास्क जरूर लावा. कोरोना संक्रमित व्यक्तीमध्ये लक्षणं दिसत नसतील, तर असा व्यक्ती इतरांना संक्रमित करू शकतो आणि सेंट्रलाइज एसीमध्ये याचा धोका जास्त असतो.
कोरोनापासून बचाव करण्यासाठी हात स्वच्छ धुणं हा एक मार्ग आहे. मात्र प्रवासात वारंवार हात धुणं शक्य नाही. त्यामुळे सोबत ओले वाइप्स किंवा सॅनिटायझर जरूर ठेवा.
बाहेरील खाद्यपदार्थ खाणं शक्यतो टाळा. एखाद्या कोरोना संक्रमित व्यक्तीचा त्याला स्पर्श झालेला असू शकतो.
आपल्या सामानाला स्पर्श करण्यापूर्वी सॅनिटाइज करून घ्या. ते शक्य नसल्यास सामानाला हात लावल्यानंतर हात स्वच्छ करा.