मराठी बातम्या /बातम्या /देश /पहिल्यांदा कोरोनासंबंधी आली चांगली बातमी, उपचार घेत असलेल्या रुग्णांचा आकडा घटला

पहिल्यांदा कोरोनासंबंधी आली चांगली बातमी, उपचार घेत असलेल्या रुग्णांचा आकडा घटला

दरम्यान, आतापर्यंत जगभरात कोरोनाच्या 97.7 लाख प्रकरणं समोर आली आहेत. तर जगभरात कोरोना विषाणूमुळे 4.9 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, आतापर्यंत जगभरात कोरोनाच्या 97.7 लाख प्रकरणं समोर आली आहेत. तर जगभरात कोरोना विषाणूमुळे 4.9 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.

या सगळ्या बातम्यांमुळे नागरिकांची चिंता वाढत चालली आहे. या सर्व वाईट बातम्यांच्या दरम्यान, एक चांगली बातमी समोर आली आहे.

नवी दिल्ली, 30 मे : भारतात कोरोनाव्हायरस (Coronavirus) संसर्ग थांबण्याचं नाव घेत नाही. दररोज संक्रमित रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ होते आहे. गेल्या 24 तासांत 7964 नवीन प्रकरणं नोंदवली गेली आहेत. ही आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे. तर 265 लोक मरण पावले आहेत. या सगळ्या बातम्यांमुळे नागरिकांची चिंता वाढत चालली आहे. या सर्व वाईट बातम्यांच्या दरम्यान, एक चांगली बातमी अशी आहे की, गेल्या 24 तासांत रुग्णांच्या बरे (Recovery Rate) होण्याच्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. या कालावधीत 11 हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले आणि यामुळे पहिल्यांदा देशात सक्रिय रुग्णांची संख्या वाढण्याऐवजी ती कमी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याच्या दरात प्रचंड वाढ

शुक्रवारी 11264 कोरोनाचे रुग्ण बरे झाले, जे आतापर्यंतचे सर्वात मोठे आकडे आहे. आतापर्यंत देशभरात 82370 रुग्ण बरे झाले आहेत आणि घरी परत आले आहेत. भारतात आता बरेचा दर 47.40 वर पोहोचला आहे. विशेष म्हणजे हा दर दररोज वाढत आहे. जेव्हा देशात पहिला लॉकडाउन सुरू झाला त्यावेळेस रूग्णांच्या बरा होण्याचा दर 7.1% होता. दुसर्‍या लॉकडाऊनमध्ये तो 11.42% पर्यंत पोहोचला. यानंतर तो आणखी वाढला आणि दर 26.59 टक्क्यांवर पोहोचला. 18 मे रोजी लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू झाला तेव्हा हा आकडा 38% पर्यंत पोहोचला. आणि आता तो 47 टक्के पोहोचला. आगामी काळात यामध्ये आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे.

शिवसेना नेत्याच्या हत्येमागे भाजप नेत्याचा होता हात, 4 आरोपींनी केली अटक

मृत्यूचे प्रमाण खूपच कमी आहे

इतर देशांच्या तुलनेत भारतातही मृत्यूचे प्रमाण खूपच कमी आहे. इथे कोरोनामुळे 2.86 टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या यादीमध्ये बेल्जियम सर्वात वर आहे. इथे 16.24% रुग्णांचा मृत्यू झाला आहे. फ्रान्समध्ये ही आकडेवारी 15.37% आहे. इटली आणि ब्रिटनमधील मृत्यूचे प्रमाण 14% पेक्षा जास्त आहे. तर 5.83 टक्के रुग्ण अमेरिकेत आहेत. इथे अलिकडच्या काळात ही आकडेवारी थोडी सुधारली आहे.

रेकॉर्ड वर रेकॉर्ड बनवत आहे कोरोना, 24 तासांत समोर आला आतापर्यंतचा मोठा आकडा

एका दिवसात सर्वाधिक टेस्ट

आता भारतात चाचण्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांत सर्वाधिक 127761 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. आतापर्यंतची ही नोंद आहे. आतापर्यंत भारतात 3611599 चाचण्या घेण्यात आल्या आहेत. येत्या काही दिवसांत दररोज दीड लाखाहून अधिक नमुने चाचण्या केल्या जातील असा सरकारचा दावा आहे.

पुण्यात कोरोनाला कसं आवरणार? 24 तासांत मोठ्या संख्येनं वाढले पॉझिटिव्ह रुग्ण

संपादन - रेणुका धायबर

First published:
top videos

    Tags: Corona