नवी दिल्ली, 30 मे : देशात कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. रोज रुग्णांचे मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण समोर येत आहेत. कोरोनाने आजपर्यंत सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. आरोग्य विभागाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत सर्वाधिक नवीन प्रकरणाची आणि जास्तीत जास्त मृत्यूची संख्या नोंदवली गेली आहे. गेल्या 24 तासात 7964 नवीन प्रकरणं तर 265 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. आतापर्यंत एकूण 1,73,763 इतकी सकारात्मक प्रकरणं आहेत. या वाढत्या आकड्यांमुळे देशाता कोरोनाचा धोका आणखी वाढला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 82,370 आहे तर आतापर्यंत 4,971 जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर 47.40 टक्के इतका आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 62228 कोरोनाची नोंद झाली आहे. यापैकी 33133 सक्रिय प्रकरणे असून 26997 लोक बरे झाले आहेत. त्याच वेळी, 2098 लोकांनी आपला जीव गमावला आहे. शनिवारी सकाळी दिल्लीतील कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या 17386 वर पोहोचली. यापैकी 9142 सक्रिय रुग्ण असून 7846 लोक बरे झाले. मृतांची संख्या 398 वर पोहोचली आहे.
Highest spike of 7,964 new #COVID19 cases and 265 deaths in the last 24 hours in India. Total number of cases in the country now at 1,73,763 including 86422 active cases, 82370 cured/discharged/migrated and 4971 deaths: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/990tyBfGPe
— ANI (@ANI) May 30, 2020
गुजरातमध्ये 15934 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत 980 लोकांनी आपला जीव गमावला आहे. मध्य प्रदेशबद्दल बोलताना आतापर्यंत 7645 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यापैकी 334 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 3042 लोकांवर उपचार सुरू आहेत. त्याच वेळी, 4269 लोक बरे झाले आहेत. उत्तर प्रदेशात कोरोना रूग्णांची संख्या 7284 वर पोहोचली आहे. यापैकी 2842 लोकांवर उपचार सुरू असून 198 लोकांचा मृत्यू झाला आहे. बिहारमधील 3376, झारखंडमध्ये 511 रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.