पुणे, 30 मे : राज्यात कोरोना व्हायरसचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पुण्यातही कोरोचा प्रसार वाढतच चालला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहर आणि जिल्ह्यात 11 जणांचा मृत्यू झाला आहे तर तब्बल 302 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या वाढत्या आकड्यामुळे पुणेकरांची चिंता आणखी वाढली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दिवसभरात 186 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 7314 तर मृतांची संख्या 327 वर पोहोचली आहे. बाधितांमध्ये पुणे शहरातील 6155, पिंपरी चिंचवडमधील 495, पुणे ग्रामीणमधील 266, पुणे कंटेनमेंट आणि जिल्हा रुग्णालयातील 398 रुग्णांचा समावेश आहे. एकीकडे असं असताना दुसरीकडे, लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे मुंबईहून गावी जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे ज्या गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव नव्हता तिथेही आता कोरोनाची नवी प्रकरणं समोर येत आहेत.
शाळा जूनला नाहीतर या तारखेला होणार सुरू, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
गेली दोन महिने ग्रीन झोनमध्ये असलेल्या पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्याची अखेर मुंबईकरांनी झोप उडवली आहे. आंबेगावमध्ये आज एकाच दिवसात तब्बल 15 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून हे सर्व रूग्ण मुंबईवरून आलेले आहेत. पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये वडगाव काशिंबेग इथले एकाच कुटुंबातील 7 जण आहेत, तर फदालेवाडी येथे 3, पेठ येथे-2, शिनोली येथे-1 , घोडेगाव येथे-1 आणि एकलहरे येथे-2 असे एकाच दिवसात तब्बल 15 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने आंबेगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
आग्रामध्ये 3 जणांचा मृत्यू 25 जखमी, ताजमहलाच्या मुख्य कब्रचं रेलिंगही तुटलं
तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा आता 24 वरती पोहोचला आहे. त्यामुळे प्रशासनाने हा सर्व भाग कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला आहे. तसंच हा परिसर सील करण्यात आला आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे असं आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
संपादन - रेणुका धायबर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona