रामपूर, 30 मे : उत्तर प्रदेशातील रामपूर इथल्या शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अनुराग शर्मा यांच्या हत्येच्या कटात त्यांचे निकटवर्तीय भाजपाचे माजी जिल्हामंत्री छत्रपाल यादव यांचा हात असल्याचं समोर आलं आहे. अनुरागला रस्त्यावरून बाजूला काढण्यासाठी अशा दोन लोकांची निवड करण्यात आली ज्यांना आधीपासूनच अनुराग यांचा काटा काढायचा होता. या दोघांना छत्रपालचा भाऊ पवन याने पिस्तूल व दुचाकी दिली होती अशा खुलासा पोलिसांकडून करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी छत्रपालच्या प्लानिंगनुसार, दोघांनी 20 मे रोजी अगापूर रोडवर स्कूटीवरून घरी परतत असताना अनुरागला गोळ्या घातल्या. पोलिसांनी छत्रपाल यादव, त्याचा भाऊ पवन, बाबू उर्फ हिमांशु आणि राजकिशोर यांना शुक्रवारी अटक केली आणि खुनाचा खुलासा केला. छत्रपाल यादवची आर्थिक परिस्थिती खालावली असल्याचे एसपी शगुन गौतम यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सांगितलं. त्याने काही वर्षांपूर्वी चिट फंड कंपनीदेखील उघडली होती, ज्यामध्ये त्याला मोठं नुकसान सोसावं लागलं. याप्रकरणी त्याच्यावरही खटला दाखल करण्यात आला होता. ज्यांनी कंपनीत पैसे गुंतवले होते तो वारंवार त्याच्याकडे पैशांची मागणी करत होता असंही पोलीस तपासात समोर आलं आहे. रेकॉर्ड वर रेकॉर्ड बनवत आहे कोरोना, 24 तासांत समोर आला आतापर्यंतचा मोठा आकडा दरम्यान, अनुरागशी त्याचे मैत्रीपूर्ण संबंध होते. अनुराग शर्मानेही त्याला खूप मदत केली. त्याने पत्नीचे दागिनेही दिले होते. पण नंतर अनुराग त्याच्या बायकोच्या दागिन्यांची परत मागणी करत होता आणि इतरही त्याच्याकडे पैसे मागित होते. अशा परिस्थितीत, छत्रपालने अनुरागला रस्त्यातून बाजूला करून त्याच्या कमाईसह परिसरात आपलं नाव मोठं करण्याचा कट रचला. पुण्यात कोरोनाला कसं आवरणार? 24 तासांत मोठ्या संख्येनं वाढले पॉझिटिव्ह रुग्ण यासाठी त्याने हिमांशू उर्फ बाबूशी संपर्क साधला. ज्याला एका हत्या प्रकरणात अनुरागचा बदला घ्यायचा होता. छत्रपालच्या प्लानिंगनुसार 20 मे रोजी दोघांनी रात्री आगपूर रोडवर अनुरागला त्याच्या घरी जात असताना गोळी घातली. याप्रकरणी पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून 32 बोअरची पिस्तूल, पाच कारतूस 32 बोर, 315 बोअर दोन बंदूक, चार काडतूस 315 बोअर, दोन खोके आणि एक मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे. आरोपींना अटक करणार्या पथकाला एसपीने 20 रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. सोन्याचे भाव उतरले तर चांदी 530 रुपयांनी वधारली, वाचा काय आहेत दर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.