जाहिरात
मराठी बातम्या / देश / LockDown : लष्करात असलेल्या मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी आई-वडिलांचा 2 हजार किमी प्रवास

LockDown : लष्करात असलेल्या मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी आई-वडिलांचा 2 हजार किमी प्रवास

LockDown : लष्करात असलेल्या मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी आई-वडिलांचा 2 हजार किमी प्रवास

आर्मीमध्ये असलेल्या मुलाचे अंत्यसंस्कार करण्याची वेळ वृद्ध आई वडिलांवर आली असून त्यासाठी दोन हजार किमी प्रवास गाडीने करत आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

बेंगळुरू, 11 एप्रिल : कोरोनाला रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. आता हे लॉकडाऊन किमान दोन आठवडे वाढवलं जाण्याची शक्यता आहे. यामुळे लोकांना घराबाहेर पडता येणार नाही. लॉकडाऊनच्या काळात अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. भारतीय लष्करात सेवा बजावणाऱ्या एका आर्मी ऑफिसरचा कॅन्सरमुळं मृत्यू झाला. त्याचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात आई वडील 2 हजार किमी प्रवास करत आहेत. शौर्य चक्र विजेता कर्नल नवजोत सिंग बल यांचा कॅन्सरमुळे गुरुवारी मृत्यू झाला. फक्त 39 वर्षांचे असलेल्या नवजोत सिंग यांच्या जाण्यानं त्यांच्या वृद्ध आई वडिलांना धक्का बला आहे. यातच त्यांचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी आता गाडीने दोन हजार किमीचा प्रवास दोघेही करत आहेत. आई वडिलांवर मुलाचे अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. जड अंतकरणानं मुलाला शेवटचा निरोप देण्यासाठी गुरुग्राममध्ये राहणारे नवजोत सिंग यांचे आई वडील बेंगळुरूला जाण्यासाठी निघाले आहेत. कॅन्सरवर उपचार सुरू असतानाच नवजोत सिंग यांचे निधन झाले. हे वाचा : रस्त्यावर गरोदर महिला विव्हळत होती, आणि PMPML च्या बसचालकाने… लॉकडाऊन असल्यामुळे नवजोत सिंग यांचे पार्थिव एअरक्राफ्ट करण्याची व्यवस्था करता आली नाही. त्यामुळं आई वडिलांना मुलाला शेवटचं पाहण्यासाठी गुरुग्राम ते बेंगळुरू प्रवास करण्याची वेळ आली आहे. मुलावर अंत्यसंस्कार करता यावेत यासाठी ते इतक्या लांबचा प्रवास गाडीने करत आहेत. कर्नल नवजोत सिंग बल अठरा वर्षांपूर्वी 2002 मध्ये लष्करात भरती झाले होते. त्यांना शौर्य चक्राने गौरवण्यात आलं होतं. भारतीय सैन्यात ते दोन पॅरा रेजिमेंटमध्ये होते. वर्षभरापूर्वीच त्यांना कॅन्सरचं निदान झालं होतं. हे वाचा : ‘हे कोणी लिहिलं आहे ते मी शोधणार’, व्हायरल झालेल्या पोस्टवर भडकले रतन टाटा संपादन - सुरज यादव

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात