जगभरात वेगवेगळ्या रुपात थैमान घालतोय Corona, संशोधनात व्हायरसची 3 रूपं आली समोर

जगभरात वेगवेगळ्या रुपात थैमान घालतोय Corona, संशोधनात व्हायरसची 3 रूपं आली समोर

संशोधकांनी कोरोनाव्हायरसच्या 3 स्ट्रेन्सचा (coronavirus strain) शोध लावला आहे, टाइप-ए, टाइप-बी, टाइप-सी.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 एप्रिल : कोरोनाव्हायरसने (CoronaVirus) जगभरात थैमान घातलं आहे. मात्र जगभरात हाहाकार माजवणारा हा व्हायरस एक नव्हे तर 3 रुपात आहे. केंम्ब्रिज युनिव्हर्सिटीच्या (University of Cambridge) संशोधकांनी 24 डिसेंबर 2019 ते 4 मार्च 2020 पर्यंत जगभरातील नमुने घेऊन डाटा तयार केला आहे. कोरोनाग्रस्तांमधील जीनोम सीक्वेन्सचा अभ्यास केला आणि कोरोनाव्हायरसच्या 3 स्ट्रेन्सचा शोध लावला आहे, टाइप-ए, टाइप-बी, टाइप-सी.

टाइप ए - कोरोनाव्हायरसचा मुख्य जीनोम, जो वुहानमधील व्हायरसमध्ये आहे. त्याचं म्युटेशन झालं आणि वुहानमध्ये राहत असलेल्या अमेरिकन आणि ऑस्ट्रेलियन नागरिकांमध्ये पोहोचला जे वुहानमध्ये राहत होते. हाच व्हायरस त्यांच्या देशामध्ये पोहोचला. मात्र जास्त दिवस चीनमध्ये राहिला नाही.

टाइप बी - पूर्व आशियाई देशामध्ये कोरोनाव्हायरसचा स्ट्रेन सर्वात जास्त पसरला. हा व्हायरस आशियाव्यतिरिक्त इतर देशांमध्ये जास्त प्रमाणात पसरला नाही.

टाइप सी- हा व्हायरस युरोपीय देशांमध्ये दिसून आला. याचे रुग्ण सुरुवातीला फ्रान्स, इटली, स्वीडन आणि इंग्लंडमध्ये सापडले. रिसर्चनुसार हा व्हायरस सिंगापूरहून, जर्मनी आणि नंतर इटलीत पोहोचला. अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातील कोरोनाव्हायरस एकमेकांशी मिळतेजुळते आहेत, असं संशोधकांनी म्हटलं आहे.

मुंबईतल्या या हॉटस्पॉटमध्ये कोरोना रोखणं खरं आव्हान, हे PHOTO बघून येईल अंदाज

संशोधक डॉ. पीटर फॉर्सटर यांच्या मते, कोरोनाव्हायरसमध्ये झपाट्याने बदल झालेत. एखादं ठिकाण किंवा तेथील वातावरणामुळे पेशी, डीएनए आणि आरएनएमध्ये होणा-या बदलांना म्युटेशन म्हणतात. Journal Proceedings of the National Academy of Sciences (PNAS) मध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. भारताचा विचार करता भारतातील कोरोनाव्हायरस सिंगल म्युटेशन असलेला आहे, जो जास्त घातक नाही, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या एका मुलाखतीत पद्म भूषण डॉ. नागेश्वर रेड्डी म्हणाले होते, "कोरोना हा एक आरएनए व्हायरस आहे. तो वटवाघळापासून माणसांपर्यंत पसरला. मात्र जेव्हा हा व्हायरस इटली, अमेरिका आणि भारतात पसरला तेव्हा त्याचे जीनोटाइप्स वेगळे झाले असणार. पूर्ण व्हायरसची सीक्वेंसिंग 4 देशांमध्ये करण्यात आली आहे. पहिला अमेरिका, दुसरा इटली, तिसरा चीन आणि शेवटी भारत आहे"

कोरोनाशी दोन हात करणाऱ्या पोलिसांवरच हल्ला, हल्लेखोरांमध्ये एक होता पॉझिटिव्ह

"अभ्यासात असं दिसून आलं की इटलीपेक्षा भारतातील व्हायरसचे जीनोम वेगळे आहेत. भारतात आलेल्या कोरोनाव्हायरसच्या जीनोमचे स्पाइक सिंगल म्युटेशन असलेले आहेत. सिंगल म्युटेशन असलेला व्हायरस एक आठवड्यातच कमजोर होतो. त्यामुळे भारतासाठी कोरोनाविरोधातील लढा जिंकण जास्त कठीण नाही.", असं डॉ. रेड्डी यांनी सांगितलं.

संकलन, संपादन - प्रिया लाड

First published: April 11, 2020, 4:52 PM IST

ताज्या बातम्या