गिर सोमनाथ, 16 मे : देशावर कोरोनासारखं गंभीर संकट आलं असतानाही वाद, खून, मारामारी यांसारखे प्रकार थांबण्याचं नाव घेत नाहीत. अशातच गुजरातमधील गिर सोमनाथ इथं एक खळबळजनक घटना घडली आहे. एकाच समुहातील दोन गटात तुफान राडा झाला आहे. हे दोन्ही गट धारदार शस्त्र आणि लाठ्याकाठ्यांसह आमने-सामने आले होते. त्यानंतर झालेल्या हल्ल्यात 1 जणाचा मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. शुक्रवारी रात्री ही घटना घडली आहे.
लॉकडाऊन सुरू असताना सार्वजनिक ठिकाणी झालेल्या या प्रकारामुळे कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. दोन गट समोरासमोर आल्यानंतर झालेल्या या वादाचा गर्दीतीलच एका व्यक्तीने व्हिडिओ काढला आहे.
— Akshay Shitole (@AkshayShitole21) May 16, 2020