नवी दिल्ली, 16 मे : लॉकडाउनमुळे राज्या-राज्यात अडकलेले मजूर आपल्या मूळ गावी राष्ट्रीय महामार्गावरून चालत जात असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. अत्यंत विदारक हाल-अपेष्टा सहन करत कामगार स्वतःचा मुळगाव गाठत आहेत.त्यामुळे केंद्र सरकारने याची दखल घेत देशातील सर्व राज्य सरकारांना सूचना केलीआहे.
देशातील वेगवेगळ्या राज्यात कामाच्या शोधात आलेले मजूर लॉकडाउनमुळे अडकले गेले. हाती रोजगार नसल्यामुळे या मजुरांवर उपासमारीची वेळी आली. त्यामुळे मजुरांनी स्थलंतराचा मार्ग निवडला. काही कामगार सायकल वर जात आहेत तर काही कामगार जाण्यासाठी काहीच साधन उपलब्ध होत नाही खिशात पैसे नाही म्हणून थेट चालतच जात आहेत. हे दृश्य प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून सर्वत्र प्रसिद्ध होत असताना केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांची बदनामी होत आहे.
हेही वाचा -'अणुबॉम्ब टाकायला जातोय परवानगी द्या' नौदलाच्या पायलटनं दिली लग्नाची पत्रिका
त्याच वेळी मोठ्या प्रमाणात समाज माध्यमांवर सरकारच्या विरोधात नाराजी देखील व्यक्त केली जात आहे. यामुळेच आता केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना एका पत्रकाद्वारे सूचना केल्या आहेत. 'कुठल्याही परप्रांतीय मजुराला चालत घरी जाऊ देऊ नका' केंद्र सरकारचे सर्व राज्य सरकारांना आदेश दिल्या आहेत.
रेल्वेमार्फत सर्व परप्रांतीयांना त्यांच्या घरी पाठवले जाईल, तोपर्यंत तात्पुरत्या निवाऱ्यात सोय करण्याचे निर्देश केंद्र सरकारने राज्य सरकारांना दिले आहेत. दिवसाला सध्या 100 श्रमिक एक्स्प्रेस जातात त्या वाढवण्याची केंद्राची तयारी तयारी असून कामगारांना त्यांच्या मुळगावी जाण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
हेही वाचा - तुम्हीदेखील सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी चहा पिता का? मग 'हे' वाचाच
मजुरांनी कोणत्याही परिस्थितीत चालत जाऊ नये. तोपर्यंत त्यांना सर्व सुविधा राज्य सरकारने उपलब्ध कराव्यात. खाणे, राहणे तसंच इतर सोयी सुविधा देण्याकडे राज्य सरकारने लक्ष द्यावं, अशी सूचना देण्यात आली आहे. एकूणच राज्य सरकार वेगवेगळ्या माध्यमातून मजुरांना सोयीसुविधा उपलब्ध करून देणे हे त्यांचे काम आहे, असंही सरकारने स्पष्ट केलं आहे.
संपादन - सचिन साळवे