बागलपूर (बिहार), 16 जुलै : देशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यातच मृतांची संख्याही वाढताना दिसत आहे. मात्र बिहारमधील बागलपूर येथे एक धक्कादायक प्रकार घडला. येथील एक मेडिकल स्टोअरमध्ये बुधवारी औषध घेण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला. कोरोना चाचणी केल्यानंतर ही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले. औषध घेण्यासाठी आलेली ही व्यक्ती दुकानाबाहेरच चक्कर येऊन पडली, आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, दुकानदार मृतदेहाबाबत कोणलाही न सांगता पळून गेला. दुकानाबाहेर या व्यक्तीचा मृतदेह तब्बल पाच तास पडून होता. अखेर या घटनेची माहिती शहरातील महापौरांना लागली त्यांनी आयुक्तांना फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणाशीच संपर्क होत नसल्यामुळे अखेर त्यांनी दोन मजूरांना पीपीई किट घालून सदर मृतदेह रुग्णालयात पाठवण्यास सांगितले. कोरोना चाचणी केल्यानंतर सदर व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. वाचा- ‘रुग्णसेवा करा आणि 5000 मिळवा’; या राज्याने सुरू केली नवी योजना तबब्ल 5 तास मृतदेह होता पडून मृत रुग्णास श्वसनाचा त्रास होत होता. यासाठी तो औषध घेण्याकरिता मेडिकलमध्ये पोहचला होता. मात्र दुकानाजवळ येताच त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि दुकानाच्या पायऱ्यांवरच पडला. अनेक तास त्याच अवस्थेत हा व्यक्ती होता. स्थानिकांची गर्दी जमली पण कोणीही मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. सकाळी साडेदहा वाजल्यापासून संध्याकाळी चार वाजेपर्यंत मृताचा मृतदेह औषध दुकानातील दाराजवळच होता. वाचा- कडक Lockdownअसूनही पुण्यात ‘कोरोना’ची स्थिती बिघडली, 24 तासांत 35 जणांचा मृत्यू मृतदेह न घेता निघून गेला रुग्णवाहिकेचा चालक भागलपूर केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनचे सरचिटणीस प्रशांत लाल ठाकूर यांनी सांगितले की त्यांना कोतवाली पोलिस, महापौर आणि डीएम कार्यालयात फोन करून संपूर्ण माहिती दिली. दुपारी 12: 15 वाजता, तातारपूर पोलीस आले आणि थोड्याच वेळानंतर रुग्णवाहिका आली. कोरोनाच्या भीतीने, पोलिसही त्यांच्या कर्तव्याची पूर्तता न करताच निघून गेले तर रुग्णवाहिका मृतदेह न उचलता निघून गेली. अखेर उपमहापौर तेथे दाखल झाले आणि त्यांनी हा मृतदेह तपासणीसाठी पाठवला. बुधवारी संध्याकाळी उशिरा मृतदेहाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. अशा परिस्थितीत, जे लोक औषधाच्या दुकानात औषध विकत घेण्यासाठी आले होते, त्यांना कोरोना संसर्ग होण्याची शक्यता आहे. वाचा- बापरे! नवरदेवाला 25 हजार दंड, नवदाम्पत्याला कोरोना तर लग्नघरासह 7 घरे केली सील
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.