जाहिरात
मराठी बातम्या / देश / 'रुग्णसेवा करा आणि 5000 मिळवा'; या राज्याने सुरू केली नवी योजना

'रुग्णसेवा करा आणि 5000 मिळवा'; या राज्याने सुरू केली नवी योजना

'रुग्णसेवा करा आणि 5000 मिळवा'; या राज्याने सुरू केली नवी योजना

अद्याप कोरोनाची लस सापडलेली नाही, त्यामुळे विविध उपचारांचा अवलंब केला जात आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

बंगळुरू, 16 जुलै : देशभरात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अद्याप कोरोनावर लस शोधण्यात शास्त्रज्ञांना यश आलेलं नाही. त्यामुळे रुग्णांना वाचविण्यासाठी विविध पर्यायांचा अवलंब केला जात आहे. त्यापैकी प्लाझ्मा उपचार पद्धतीचा अनेक राज्यांमध्ये वापर केला जात आहे. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांच्या प्लाझ्माच्या मदतीने कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहे. काही अंशी यात यशही येत आहे. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना प्लाझ्मा दान करण्याचं आवाहन विविध राज्य सरकारांमार्फत केलं जात आहे. त्यापैकी एका राज्य सरकारने प्लाझ्मा दान करणाऱ्यांना बक्षीण म्हणून काही निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. हे वाचा- ‘मला कोरोना झाल्यास सरकारी रुग्णालयातच न्या’; फडणवीसांचं ते संभाषण व्हायरल कर्नाटक सरकारने बुधवारी सांगितले की कोरोना व्हायरसमधून बरे झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे, त्यांना सरकार 5000 रुपयांचा निधी देणार आहे. मेडिकल शिक्षा मंत्री के. सुधाकर यांनी सांगितले की राज्यात आतापर्यंत 17,390 जणं बरे झाले आहेत. ज्यापैकी 4992 रुग्ण बंगळुरुचे आहेत. त्यांनी कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना प्लाझ्मा दान करण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान कोरोनाव्हायरसविरोधातील लस (coronavirus vaccine) कधी येणार याची प्रतीक्षा प्रत्येकालाच आहे. कदाचित तो दिवस आला. कोरोना लशीबाबतची सर्वाच मोठी गूड न्यूज आज मिळू शकते. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी (oxford vaccine) तयार करत असलेल्या लशीविषयी चांगली बातमी आज मिळेल असं वृत्त रॉयटर्सने दिलं आहे. देशभरात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने नागरिक कोरोना लशीची प्रतीक्षा करीत आहे. अनेक ठिकाणी यासंदर्भातील प्रयोग सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात