Home /News /maharashtra /

बापरे! नवरदेवाला 25 हजार दंड, नवदाम्पत्याला कोरोना तर लग्नघरासह 7 घरे केली सील

बापरे! नवरदेवाला 25 हजार दंड, नवदाम्पत्याला कोरोना तर लग्नघरासह 7 घरे केली सील

प्रेयसीचे आई-वडील नाहीत. त्यामुळे लग्नात प्रेयसीला गिफ्ट म्हणून सोन्याचे दागिने देण्याची प्रियकराची इच्छा होती. मात्र त्याच्याकडेही पैसे नसल्याने त्याने थेट सोन्याचं दुकान लुटलं.

प्रेयसीचे आई-वडील नाहीत. त्यामुळे लग्नात प्रेयसीला गिफ्ट म्हणून सोन्याचे दागिने देण्याची प्रियकराची इच्छा होती. मात्र त्याच्याकडेही पैसे नसल्याने त्याने थेट सोन्याचं दुकान लुटलं.

पिपरी येथील विवाह सोहळ्यासाठी प्रशासनाकडून कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. धक्कादायक म्हणजे लग्नघरी कंदुरीच्या कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं होतं.

    वर्धा, 15 जुलै: देशासह राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी शासन, प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी शासनानं गेल्या पाच महिन्यात अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र, काही हौशी लोक हे सर्व नियम-अटी धाब्यावर ठेवत असल्याच पाहायला मिळत आहे. . हेच नियम मोडणे वर्धा जिल्ह्यातील काही लोकांना चांगलंच महागात पडलं आहे. एका विवाह सोहळ्यामुळे जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. हेही वाचा...लडाखमध्ये आणखी एक भारतीय जवान शहीद, जालना जिल्ह्यात पसरली शोककळा वर्धा जिल्ह्यात पिपरी मेघे येथे झालेला विवाह सोहळातील नवरदेव, नवरीसह सात जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. या पार्श्वभूमीवर लग्नघरासह आजुबाजुची तब्बल सात घरं कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. एवढंच नाही तर पोलिसांनीही नवरदेवावर दंडात्मक कारवाई केली आहे. पोलिसांनी नवरदेवावर सुमारे 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या लग्नाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून पोलिसांकडून कडक कारवाई केली जात आहे. कंदुरीचा कार्यक्रमाला तोबा गर्दी... पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पिपरी येथील विवाह सोहळ्यासाठी प्रशासनाकडून कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. धक्कादायक म्हणजे लग्नघरी कंदुरीच्या कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं होतं. कंदुरीच्या कार्यक्रमाला तोबा गर्दी झाली होती. सोशल डिस्टंसिंगचा तर फज्जा उडाला होता. आता कंदुरीच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांचा पोलिस आणि आरोग्य कर्मचारी शोध घेत आहेत. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये या पार्श्वभूमीवर वर्ध्याचे जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी नवा आदेश जारी केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने लग्न सोहळ्याबाबत नवी नियमावली जारी केली आहे. या नव्या नियमावलीनुसार लग्नात 20 पेक्षा जास्त नातेवाईक सहभागी झाल्यास त्यांच्याविरोधात दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. हेही वाचा...शेतात गेलेल्या मायलेकी घरी परतल्याच नाही, नाल्यात सापडल्या अशा अवस्थेत विवाह सोहळ्यासाठी दुसऱ्या जिल्ह्यातील व्यक्ती उपस्थित राहिल्यास आयोजकांवर कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात येईल. याशिवाय आयोजकांकडून 10 हजार रुपये दंड वसूल करण्यात येईल. लग्नात सहभागी झालेल्या प्रत्येक नातेवाईकाला 14 दिवस विलगीकरणात राहणे अनिवार्य राहील.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Corona, Coronavirus, Wardha

    पुढील बातम्या