Home /News /pune /

कडक Lockdownअसूनही पुण्यात ‘कोरोना’ची स्थिती बिघडली, 24 तासांत 35 जणांचा मृत्यू

कडक Lockdownअसूनही पुण्यात ‘कोरोना’ची स्थिती बिघडली, 24 तासांत 35 जणांचा मृत्यू

पुणे विभागातील 31 हजार 390 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 51 हजार 198 झाली आहे.

पुणे 15 जुलै: पुणे आणि परिसरात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सरु असतानाही कोरोनाचा उद्रेक काही कमी होतांना दिसत नाही. जिल्ह्यात आज 35 जणांचा मृत्यू झाला. त्यात पुण्यात 18, पिंपरी-चिंचवडमध्ये 16 तर ग्रामीण भागात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्यूची एकूण संख्या 1176 एवढी झाली आहे. जिल्ह्यात आज 1510 नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 42836 एवढी झाली आहे. रुग्णांची  संख्या वाढत असल्याने शहरात पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आला आहे. सोमवारपासून हा लॉकडाऊन सुरू झाला आहे. दरम्यान, व्हेंटिलेटर न मिळाल्यामुळे एका निवृत्त शास्त्रज्ञाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. बुधवारी (15 जुलै) पहाटे त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्यांना कोरोना असल्याचे निदान झाले आहे. व्हेंटिलेटर न मिळाल्यामुळे त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. डॉ.पी.लक्ष्मी नरसिंहन (वय 61) असं त्या माजी शास्त्रज्ञांचं नाव आहे. पुण्यातील बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियातून ते वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून निवृत्त झाले होते. त्यांच्यामागे पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे. दरम्यान,  पुणे विभागातील 31 हजार 390 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 51 हजार 198 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 18 हजार 196 आहे.  तसेच 654 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 61.31 टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण   3.15  टक्के आहे,अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे. 'मला कोरोना झाल्यास सरकारी रुग्णालयातच न्या’; फडणवीसांचं ते संभाषण व्हायरल गेल्या 24 तासांमध्ये राज्यात  7975  एवढ्या रुग्णांची भर पडली. तर 233 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 2,75,640    वर गेली असून मृत्यूचा आकडा 10928वर गेला आहे. आज एवढ्या जणांना सुटी देण्यात आली आहे. राज्यातल्या ACTIVE रुग्णांची संख्या 1,11,801 एवढी झाली आहे. रुग्णसंख्या वाढत असतांनाच राज्याचा मृत्यू दर घसरला असून तो 3.96 टक्क्यांवर आला आहे. COVID-19: राज्यात आजही विक्रमी 7975रुग्णांची भर, मृत्यू दर घसरल्याने दिलासा मुंबईत 1374 नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 96474 झाली आहे. तर आज 62 जणांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत मृत्यू झालेल्या रूग्णाचा आकडा 5467 झाला आहे. आज ठाणे महापालिका क्षेत्रात 400 कोरोणा पॉझिटिव्ह  रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोना बाधितांची संख्या एकूण 14419 झाली आहे
Published by:Ajay Kautikwar
First published:

पुढील बातम्या