Home /News /national /

कोरोनाच्या संकटात यांना विसरलात; मात्र हा तरुण दररोज 700 कुत्र्यांचं भरतोय पोट

कोरोनाच्या संकटात यांना विसरलात; मात्र हा तरुण दररोज 700 कुत्र्यांचं भरतोय पोट

लॉकडाऊनमध्ये रेस्टॉरंट्स आणि हॉटेल बंद असल्यामुळे त्यांना खायला मिळत नाहीये. लोकांनी घाबरुन कुत्र्यांना अन्न देणे देखील बंद केलं आहे.

    नोएडा, 15 जून : लॉकडाऊनमध्ये कार्यालयं बंद झाल्यामुळे नोएडा येथील एका तरूणाने आपल्या मोकळ्या वेळात  रस्त्यांवरील कुत्र्यांची सेवा करण्याचा निर्णय घेतला. माणसांवर कोरोनाचं संकट आहेच, मात्र प्राणी देखील काळजीत आहेत. विशेषत: भटके कुत्रे. लॉकडाऊनमध्ये रेस्टॉरंट्स आणि हॉटेल बंद असल्यामुळे त्यांना खायला मिळत नाहीये. लोकांनी घाबरुन कुत्र्यांना अन्न देणे देखील बंद केले आहे. विदित शर्मा यांनी कुत्र्यांच्या या परिस्थितीवर दया दाखविली आणि कुत्र्यांना भुकेले जाऊ देऊ नये असा निर्णय घेतला. विदित दिवसातून दोन वेळा नोएडातील रस्त्यावरील कुत्र्यांचा जेवण घेऊन जातो. दररोज 700 कुत्र्यांना देतो अन्न गेल्या दोन महिन्यांपासून नोएडामधील भटक्या कुत्र्यांना विदित भोजन देत आहे. याची सुरुवात त्याने आपल्या परिसरातील चार कुत्र्यांपासून केली. आणि आता तर दररोज 700 कुत्र्यांना तो अन्न देत आहेत. विदितने सांगितले की गेली चार वर्षे तो भटक्या कुत्र्यांना अन्न देत आहे. विदितने सांगितले की, आता त्याचे कार्यालय सुरु झाले आहे. म्हणून तो आता फक्त रात्रीच कुत्र्यांना खायला घालण्यासाठी बाहेर पडतो. दिवसासाठी त्यांने एक रिक्षाचालक भाड्याने घेतला आहे. जो त्याच्या अनुपस्थितीत कुत्र्यांना अन्न पुरवतो. कुत्र्यांसाठी तो दररोज शंभर किलो तांदळाचा भात बनवतो. कुत्र्यांच्या अन्नात (भातात) दोनशे अंडी आणि सोयाबीन मिसळले जातात. कधीकधी ब्रेड, लापशी आणि दूधही दिले जाते. . कुत्र्यांच्या गळ्याभोवती बांधलं रेडियम रात्रीच्या वेळी अपघातापासून बचाव करण्यासाठी त्याने कुत्र्यांच्या गळ्याभोवती रेडियमचे पट्टे देखील बांधण्यास सुरुवात केली आहे. यामुळे रिक्षाचालक कुत्र्यांना ओळखू शकतो. हे वाचा-पाकिस्तानात डांबून ठेवलेल्या अधिकाऱ्यांना भारतात परत पाठवा - परराष्ट्र मंत्रालय संपादन - मीनल गांगुर्डे
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या