राज्यात पहिल्यांदाच अॅक्टिव्ह रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढली; एका दिवसात 5 हजारांवर रुग्णांना डिस्चार्ज

राज्यात पहिल्यांदाच अॅक्टिव्ह रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढली; एका दिवसात 5 हजारांवर रुग्णांना डिस्चार्ज

बरं होणाऱ्या रुग्णांची संख्या अॅक्टिव्ह रुग्णसंख्येपेक्षा पहिल्यांदाच वाढली आहे. त्यामुळे दिलासा मिळाला असला, तरी नव्या रुग्णांच्यात वाढ होण्याचं प्रमाण कायम आहे.

  • Share this:

मुंबई 9 जून:  अनलॉक नंतर पहिल्यांदाच राज्यात एका दिवशी 5 हजारांवर रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. बरं होणाऱ्या रुग्णांची संख्या अॅक्टिव्ह रुग्णसंख्येपेक्षा पहिल्यांदाच वाढली आहे. त्यामुळे दिलासा मिळाला असला, तरी नव्या रुग्णांच्यात वाढ होण्याचं प्रमाण कायम आहे.

एकीकडे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी 178 जणांचा आज राज्यात कोरोनामुळे मृत्यू नोंदवला गेला आहे. आजही राज्यात अडीच हजारांपेक्षा जास्त म्हणजे तब्बल 2786 रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 110744 झाली आहे. गेले काही दिवस राज्यात सातत्याने अडीच ते तीन हजारांच्या जवळपास रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे लवकरच राज्यातला आकडा भराभर वाढतो आहे. राज्यात आतापर्यंत 4128 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला  आहे.

मुंबईतील 950 कोरोना मृत्यू का दडवले? फडणवीसांचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप

अनलॉक फेज सुरू झाल्यानंतर आता पावसाळ्यात कोरोनाग्रस्तांची संख्या आणखी वाढण्याचा धोका आहे.

राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण - 50.61  टक्के

मृत्यूदर -  3.70 टक्के

सध्या राज्यात 5,89,158 लोक होम क्वारंटाइन आहेत. 28,084 संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

गेल्या तीन महिन्यांची आकडेवारी पाहता मेमध्ये सर्वाधिक रुग्ण बरे झालेले दिसून येत आहेत. एका दिवशी 8 हजारांवर रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचा विक्रम मे मध्ये झाला होता. यासोबतच राज्यातील रुग्ण दुपटीचा कालावधी 11 वरून 17.5℅ दिवसांवर गेला आहे.

मुंबईतील दैनंदिन रुग्णवाढीचा दर आता कमी झाला आहे, असं मुंबई महापालिकेच्या आकडेवारीतून दिसून येतं आहे.

आठवडाभरापूर्वी म्हणजे 27 मे रोजी जारी केलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत नवीन कोरोना रुग्णवाढीचा दैनंदिन सरासरी दर 5.17 टक्के  होता. जो 2 जूनला 3.64 टक्के झाला आहे. याचा अर्थ मुंबईत दररोज नवीन रुग्ण आढळण्याचं प्रमाण आता कमी झालं आहे.

अन्य बातम्या

कोरोनाच्या संकटात यांना विसरलात; मात्र हा तरुण दररोज 700 कुत्र्यांचं भरतोय पोट

'सुशांतची आत्महत्या नव्हे मर्डर', करण जोहरचं नाव घेत कंगनानंतर बबिताचाही आरोप

First published: June 15, 2020, 10:06 PM IST

ताज्या बातम्या