कोरोनाचा कहर, मुलाने हॉस्पिटलच्या खिडकीतून पाहिलं वडिलांचं शव, व्हिडीओ कॉलद्वारे केला अंत्यसंस्कार

प्रातिनिधिक फोटो

अशा बिकट परिस्थितीतही तरुणाने सामाजिक बांधिलकी व जबाबदारी दाखविल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्याचं कौतुक केलं आहे

  • Share this:
    कोट्ट्यम, 15 मार्च : रुग्णालयातील वॉर्डच्या खिडकीतून एक मुलगा अगतिकपणे आपल्या वडिलांचा मृतदेह घेऊन जाताना पाहत होता. हे दृश्य अंगावर काटा आणणारे होते. कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) प्रभावित झालेल्या आणि 8 मार्च रोजी कतारहून (Katar) परत आलेल्या 30 वर्षीय रमेशला (नाव बदलले आहे) वडिलांच्या शेवटच्या क्षणी त्यांच्यासोबत राहायचे होते. रमेशचे वडील पलंगावरुन पडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोविड – 19 (Covid - 19) च्या प्रभावित देशातून प्रवास केल्यामुळे आणि हलक्या खोकल्यामुळे त्रस्त झाल्याने रमेश आरोग्य अधिकाऱ्यांकडे गेला होता. त्यानंतर त्याला रुग्णालयाच्या स्वतंत्र  वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. रुग्णालयात स्टोकमुळे त्याच्या वडिलांची प्रकृती खालावली होती आणि त्यातच 9 मार्च रोजी त्यांचा मृत्यू झाला. संबंधित - भारतात कोरोना रुग्णांची संख्या शंभरीपार, 4 देशांनंतर आता पाकिस्तान बॉर्डरही सील त्याच रुग्णालयात दाखल झाल्यानंतरही रमेश शेवटच्या वेळी त्यांच्या वडिलांची भेट घेऊ शकला नाही. वडिलांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून घेऊन जात असताना, तो रुग्णालयाच्या खोलीच्या खिडकीतून त्यांना पाहत होता. व्हिडीओ कॉलद्वारे त्याने आपल्या वडिलांचे अंत्यदर्शन घेतले. रमेशने 12 मार्च रोजी आपल्या फेसबुक पेजवर लिहिले होते की, "जर मी डॉक्टरांकडे आलो नसतो तर मी माझ्या वडिलांना शेवटच्या वेळी भेटू शकलो असतो, परंतु मला संसर्ग झाल्यास इतरांना हा रोग पसरवायचा नव्हता म्हणून मी असं केलं नाही. कृपय़ा इतर देश वा राज्यातून प्रवास केलेल्यांनी आधी आरोग्य अधिकाऱ्यांकडे जाऊन तपासणी करावी." अशा अवघड परिस्थितीतही स्वत:ला रुग्णालयात दाखल करुन घेण्याच्या निर्णयाचे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन (P. Vijayan) यांच्यासह अनेकांनी कौतुक केलं आहे. मुख्यमंत्री  शुक्रवारी म्हणाले, “हे फारचं वाईट आहे. हा तरुण आपल्या वडिलांना भेटायला इतका लांब प्रवास करुन आला होता. येथे पोहोचल्यानंतरही त्याला शेवटच्या वेळेस वडिलांना भेटता आलं नाही, सामाजिक बांधिलकी व जबाबदारी दाखवित त्याने स्वत: ला आरोग्य अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केले." संबंधित - सर्दी, खोकला झाल्यानं गेली दवाखान्यात, चीनमधून आल्याचं सांगताच डॉक्टर झाले गायब व्हायरल झालेल्या एका फेसबुक पोस्टमध्ये रमेशने लिहिले आहे की, तो रूग्णालयात दाखल झालेल्या वडिलांना भेटण्यासाठी केरळ येथे आला होता. पलंगावरुन खाली पडल्यामुळे त्याच्या वडिलांच्या शरीराअंतर्गत रक्तस्त्राव झाला होता. रमेशने लिहिले की, "मी विमानतळावर आवश्यक फॉर्म भरले आणि रुग्णालयात पोहोचलो. माझ्या शरीराचे तापमान सामान्य झाल्यानंतरही मी सर्वांपासून अंतर ठेवले. मला थोडा खोकला झाला होता आणि घसाही खवखवत होता. माझ्या कुटुंबाचा आणि मित्रमैत्रिणींचा विचार केल्यानंतर मी आधी डॉक्टरकडे जाण्याचं ठरवलं. रमेश त्याच्या वडिलांना दाखल केलेल्या रुग्णालयाच्या कोरोना वॉर्डातील डॉक्टरांना भेटला. कतार येथून तो प्रवास करुन आल्याने त्याला वेगळ्या वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं. त्याने पुढे असेही लिहिले की, “रात्री उशिरा वडिलांना स्ट्रोकचा झटका आला आणि त्यांचं निधन झालं. मी त्यांच्या अगदी जवळ होतो, पण वेगळ्या वॉर्डात असल्यामुळे मी त्यांना भेटू शकलो नाही. रमेशच्या चौकशी अहवालात या संसर्गाची पुष्टी झालेली नाही आणि तो लवकरच इडुक्की जिल्ह्यातील थोडोपुझा येथील आपल्या घरी परत येणार आहे. संबंधित - दुष्काळात तेरावा महिना; 'कोरोना'सह आता बर्ड फ्लू, स्वाइन फ्लूचा कहर
    First published: