भारतात कोरोना रुग्णांची संख्या शंभरीपार, 4 देशांनंतर आता पाकिस्तान बॉर्डरही करणार सील

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या आदेशानुसार या चार शेजारील देशांच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या आदेशानुसार या चार शेजारील देशांच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत

  • Share this:
    नवी दिल्ली, 15 मार्च : भारतात कोरोना (Coronavirus) विषाणूच्या रुग्णांचा आकडा शंभरीपार गेला आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) शनिवारी रात्री 5 नवीन कोरोनाचे (Positive) रुग्ण दाखल झाले. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांची संख्या 96 वरुन 101 वर गेली आहे. कोरोनाचे वाढता संसर्ग पाहता केंद्र सरकारने कोविड – 19 (Covid - 19) ला  राष्ट्रीय आपत्ती घोषित केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सार्क देशांबरोबर व्हिडीओ कॉन्फरन्सींग द्वारे जगात वाढलेल्या कोरोनाच्या उपाययोजनसंदर्भात चर्चा करतील. संबंधित - कोरोनो संशयित जोडपे सार्वजनिक कार्यक्रमात झाले सहभागी, लोकांमध्ये भीती महाराष्ट्रात 5 नवीन प्रकरणे नोंदली गेली यापूर्वी देशात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या 96 होती. रात्री उशिरा आलेल्या वृत्तानुसार महाराष्ट्रातील आणखी 5 जण या आजाराने ग्रस्त आहेत. यापैकी 3 महिला आणि २ पुरुष आहेत. या पाचपैकी चार जण दुबईला गेले होते, तर 21 वर्षांचा पाचवा रुग्ण थायलंडहून आला आहे. यासह, महाराष्ट्रात कोरोना विषाणूमुळे पीडित लोकांची संख्या 31 वर आली आहे. 3 संशयित रुग्णालयातून बेपत्ता अहमदनगरमधील एका शासकीय रुग्णालयातून कोरोना विषाणूचे संशयित तीन रुग्ण पळून गेले होते. हे रुग्ण निरीक्षणाखाली होते. मात्र, यातील दोन रुग्ण रात्री उशिरापर्यंत जिल्हा रुग्णालयात परत आले. तोपखाना पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, तिसर्‍या रुग्णाचा शोध सुरू आहे. यापूर्वी दोन महिला आणि एका पुरुषाला आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. या तिघांच्या वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा आहे. संबंधित - दुष्काळात तेरावा महिना; 'कोरोना'सह आता बर्ड फ्लू, स्वाइन फ्लूचा कहर पाक सीमाही सील केली जाईल दरम्यान, परदेशातून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने पाच शेजारील देशांच्या सीमा सील करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार, भारत-नेपाळ (India - Nepal), भारत-बांगलादेश (India - Bangladesh), भारत-भूतान (India - Bhutan), भारत-म्यानमार (India - Myanmar) सीमारेषा सील करण्यात आल्या आहेत. 14 मार्च रोजी 12 वाजता ही कारवाई करण्यात आली आहे. 15 मार्चच्या रात्री 12 वाजल्यापासून पाकिस्तानच्या सीमाही सील करण्यात येणार आहे. आता या हद्दीतून प्रवाशांच्या प्रवेशावर बंदी आहे. करतारपूर कॉरिडोरही बंद करतारपूर साहिब कॉरिडोरही आज रात्रीपासून बंद करण्यात येणार आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये खुले करण्यात आलेले करतारपूर कॉरिडोरवरून 650 ते 800 लोक दररोज करतारपूर साहिबला भेट देण्यास येतात. परंतु कोरोना संसर्गाच्या बातमीनंतर ही संख्या 250 वर आली आहे
    First published: