जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / नवाब मलिक यांच्याविरोधात FIR दाखल, राष्ट्रीय महिला आयोगाला विनंती पत्र

नवाब मलिक यांच्याविरोधात FIR दाखल, राष्ट्रीय महिला आयोगाला विनंती पत्र

नवाब मलिक यांच्याविरोधात एफआयआर दाखल केली असल्याची माहिती क्रांती रेडकर यांनी दिली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 28 ऑक्टोबर: गेल्या काही दिवसांपासून आर्यन खान (Aryan Khan) ड्रग्ज प्रकरणी (Drugs Case) राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (NCB official Sameer Wankhede) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नवाब मलिकांनी केलेल्या आरोपांनंतर मलिक आणि वानखेडे असा वाद उफाळला आहे. दोघंहीआरोप- प्रत्यारोप करताना दिसत आहेत. अशातच नवाब मलिक यांच्याविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर वानखेडे यांची बहिण यास्मिन वानखेडे यांनी याबाबत पोलिसांत धाव घेतली असल्याची माहिती समीर वानखेडे यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी दिली आहे. एएनआयनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

जाहिरात

राष्ट्रीय महिला आयोगाला विनंती पत्र ANI नं दिलेल्या वृत्तानुसार, समीर वानखेडे यांची बहिण यास्मिन वानखेडे यांनी राष्ट्रीय महिला आयोगाला पत्र लिहिलं आहे. या पत्रानुसार त्यांनी विनंती केली आहे की, आपल्या संविधानिक हक्कांचं संरक्षण व्हावं. हेही वाचा-  समीर वानखेडेंची साडे चार तास चौकशी, NCB वरिष्ठ अधिकारी म्हणाले… यास्मिन वानखेडे यांनी नवाब मलिकांविरोधात पोलिसांत एफआयआर दाखल करण्यासाठी तक्रार दिली आहे. क्रांती रेडकर यांची प्रतिक्रिया क्रांती रेडकर यांनीही नवाब मलिक यांच्याविरोधात एफआयआर दाखल केल्याची माहिती दिली होती. आमचे वैयक्तिक फोटो शेअर करून नवाब मलिक यांनी घेतलेल्या संविधानिक शपथेविरुद्ध वागत आहेत. आम्ही त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करणार असून एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

समीर वानखेडे यांना पदावरून हटवण्याचा केवळ हाच त्यांचा एकच हेतू आहे. जेणेकरून त्यांच्या जावयाला वाचवता येईल, असा आरोपही क्रांती रेडकर यांनी नवाब मलिक यांच्यावर केला आहे. निकाह नाम्यावर क्रांती रेडकर यांचं उत्तर समीर यांचा निकाहनामा बरोबर आहे. निकाह झाला पण समीरने कायदेशीररित्या धर्म, जात बदलली नाही. माझी सासू मुस्लिम आहेत आणि त्यामुळे त्यांच्या आनंदासाठी निकाह झाला ही केवळ औपचारिकता होती. नवाब मलिक यांनी शेअर केलेले जन्म प्रमाणपत्र चुकीचं असल्याचं क्रांती रेडकर यांनी सांगितलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात