मुंबई, 28 ऑक्टोबर: या महिन्याच्या सुरुवातीला एनसीबीनं (NCB) क्रूझवरील ड्रग्स पार्टीचा पदार्फाश केला. एनसीबीच्या या कारवाईवर एनसीपी नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आरोप केले. त्यानंतर आता हे प्रकरण इतकं पेटलं असून एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची चौकशी सुरु आहे. दरम्यान दुसरीकडे या प्रकरणाची चौकशी (Investigation) देखील सुरु आहे. त्यामुळे क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणाची (Cruise Drugs Party case) चौकशी कोण करणार असा सवाल उपस्थित झाला. त्यावर एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह (NCB Deputy Director General Gyaneshwar Singh) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
कॅडेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणाची चौकशी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हेच करतील, असं ज्ञानेश्वर सिंह यांनी स्पष्ट केलं आहे. जोपर्यंत समीर वानखेडे यांच्याविरोधात ठोस पुरावे मिळत नाहीत तोपर्यंत त्यांच्याकडून तपास काढून घेण्यात येणार नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
Sameer Wankhede was questioned today. He submitted case related documents that were sought. If needed, he'll be questioned further. He'll remain the investigating officer in the drugs-on-cruise ship case until substantial information is found against him: DDG NCB Gyaneshwar Singh pic.twitter.com/lleD8UvJN5
— ANI (@ANI) October 27, 2021
समीर वानखेडे यांची चार तास चौकशी
समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची बुधवारी चार तास चौकशी करण्यात आली. एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी ज्ञानेश्वर सिंह (Dnyaneshwar Singh) यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे. या चौकशीदरम्यान काही महत्त्वपूर्ण कागदपत्रही एनसीबीनं ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातला पंच प्रभाकर साईलनं किरण गोसावी आणि समीर वानखेडे यांच्यावर डील केल्याचा खळबळजनक आरोप करत गौप्यस्फोट केला. समीर वानखेडे यांनी काही साध्या कोऱ्या कागदावर सही घेतल्याचा आरोपही प्रभाकर साईलनं केला. या संदर्भात बुधवारी समीर वानखेडे यांचा जबाब नोंदवण्यात आला. मात्र 25 कोटींच्या डीलचा आरोप करणाऱ्या प्रभाकर साईल यांनी दोन दिवसात एनसीबीसमोर आपला जबाब नोंदवण्यासाठी हजर राहावं, असं ज्ञानेश्वर सिंह यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा- समीर वानखेडे कुटुंबीयांची नवाब मलिकांविरोधात कारवाई, क्रांती रेडकर यांची प्रतिक्रिया
वानखेडे यांच्या चौकशीसाठी एनसीबीचं पथक दिल्लीहून मुंबईत आलं आहे. प्रभाकर साईल यांनी केलेल्या आरोपानंतर बुधवारी पाच सदस्यीय टीम दिल्लीहून मुंबईत पोहोचली. या पथकानं वानखेडे यांची चौकशी केली. पथकानं एनसीबीच्या मुंबई कार्यालयातून काही कागदपत्रे आणि काही व्हिडिओ क्लिप ताब्यात घेतल्या.
बुधवारी समीर वानखेडे यांचा जवळपास साडेचार तास जबाब नोंदवण्यात आला. येत्या काळात त्यांची आणखी काही मदत घेण्यात येईल. या तपासाला पुढे चालू राहू द्यावं. तसंच गोसावी आणि प्रभाकर साईल यांनी तपासाला सहकार्य करावं, असं ज्ञानेश्वर सिंह यांनी म्हटलं आहे. तसंच आमच्याकडे असलेल्या पत्त्यावर नोटीस पाठवण्याचा प्रयत्न झाला. एकाच्या घराला टाळं होतं. तर दुसऱ्याचा पत्ता तपासला जात आहे. त्यामुळे त्या दोघांनाही नोटीस पोहोचलेली नाही. त्यांनी येत्या दोन दिवसात वांद्र्यात सीआरपीएफ मेस येथे येऊन त्यांनी आपली बाजू मांडावी, असं सिंह यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा- Breaking News: महिला शेतकरी आंदोलकांना ट्रकनं चिरडलं, तिघींचा मृत्यू
दरम्यान या प्रकरणी एनसीबी शाहरुख खानची व्यवस्थापक पूजा दादलानी यांच्यासह के. पी गोसावी, प्रभाकर साईल यांचाही जबाब नोंदवण्यात येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: NCB