मराठी बातम्या /बातम्या /देश /

Breaking News: महिला शेतकरी आंदोलकांना ट्रकनं चिरडलं, तिघींचा मृत्यू; तीन महिला गंभीर जखमी

Breaking News: महिला शेतकरी आंदोलकांना ट्रकनं चिरडलं, तिघींचा मृत्यू; तीन महिला गंभीर जखमी

हरियाणातील (Haryana)  बहादुरगड (Bahadurgarh) मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

हरियाणातील (Haryana) बहादुरगड (Bahadurgarh) मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

हरियाणातील (Haryana) बहादुरगड (Bahadurgarh) मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Published by:  Pooja Vichare

हरियाणा, 28 ऑक्टोबर: हरियाणातील (Haryana) बहादुरगड (Bahadurgarh) मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन महिला शेतकरी (three women farmer protesters) आंदोलकांना ट्रकनं (Truck runs over them) चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघतात तीन महिला शेतकरी आंदोलकांचा मृत्यू झाला असून तीन महिला शेतकरी गंभीर जखमी झाल्या आहेत.

एक धावता ट्रक त्यांच्या अंगावरुन गेल्याची माहिती समोर येतेय. या महिला डिव्हायडर बसल्या असताना हा अपघात घडला. यात तिघींचा मृत्यू तर तीन जणी गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमी महिला शेतकरी आंदोलकांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

हेही वाचा-Hair Care Tips: कोंडा झालाय? मग हे घरच्या घरी केलेलं Hair Mask ट्राय करा 

हा अपघात टिकरी सीमेवर घडला आहे. जिथे सध्या शेतकरी आंदोलन करत आहेत.

नेमकी कशी घडली घडना

हरियाणाच्या बहादुरगडमध्ये एका भरधाव ट्रकनं महिला शेतकरी आंदोलकांना चिरडलं. या अपघातात तीन वृद्ध महिलांचा मृत्यू झाला असून तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 6.30 च्या सुमारास झज्जर रोडवर हा अपघात झाला. या वृद्ध महिला दुभाजकावर बसल्या होत्या, तेव्हा एका भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली. त्यामुळे दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर एका महिलेचा रुग्णालयात मृत्यू झाला. तर अन्य तीन महिलांची प्रकृती अद्याप चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे.

हेही वाचा-  समीर वानखेडे कुटुंबीयांची नवाब मलिकांविरोधात कारवाई, क्रांती रेडकर यांची प्रतिक्रिया

या तिन्ही महिला शेतकरी आंदोलनात सहभागी होत्या. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तीन महिला पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. पहाटेच्या सुमारास महिला घरी जाण्यासाठी ऑटोची वाट पाहत दुभाजकावर बसल्या होत्या. तेव्हा झज्जर रोडवरील उड्डाणपुलाखाली भरधाव वेगानं येणाऱ्या ट्रकनं त्यांना चिरडले. या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे.

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात नोव्हेंबर 2020 पासून दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या तिन्ही महिलाही या आंदोलनाशी जोडल्या गेल्या होत्या. या महिला रोटेशन अंतर्गत आपल्या घरी जाणार होत्या, मात्र त्यापूर्वीच तिघींचा मृत्यू झाला आहे.

First published:

Tags: Farmer protest, Haryana