मराठी बातम्या /बातम्या /देश /COVID19: 96 तास तुमच्या मोबाईलवर जिवंत राहू शकतो कोरोना व्हायरस! असा करा फोन साफ

COVID19: 96 तास तुमच्या मोबाईलवर जिवंत राहू शकतो कोरोना व्हायरस! असा करा फोन साफ

फोनद्वारे कोरोना विषाणूचा प्रसार होण्याचा धोकाही जास्त असतो.

फोनद्वारे कोरोना विषाणूचा प्रसार होण्याचा धोकाही जास्त असतो.

फोनद्वारे कोरोना विषाणूचा प्रसार होण्याचा धोकाही जास्त असतो.

कोरोना व्हायरसचा (corona virus) धोका दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे लोकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळं सतत हात स्वच्छ धुणे, सॅन्टीझरता वापर करणे, गर्दी टाळने अशा सुचना कोरोनापासून वाचण्यासाठी प्रत्येक वेळी दिल्या जात आहेत. परंतु आणखी एका गोष्टीतून कोरोना पसरू शकतो, ती गोष्ट आहे तुमचा मोबाइल फोन. फोनद्वारे कोरोना विषाणूचा प्रसार होण्याचा धोकाही जास्त असतो.

कोरोनाव्हायरस च्या (COVID-19) डेटा संकलनादरम्यान निष्पण्ण झाले ऑआहे की, हा विषाणू ग्लास स्लाइडवर 96 तास राहू शकतो, जो फोनच्या स्क्रीनवरही राहू शकतो. मायक्रोबायोलॉजिस्ट एम्मा हॅहर्स्ट यांनी, फोनद्वारे हा विषाणूचा प्रसार होऊ शकतो याचा पुरावा अद्याप सापडलेला नाही, परंतु फोनद्वारे त्याचा प्रसार होऊ शकत नाही याचाही पुरावा नाही आहे. त्यामुळा काळजी घेणे जास्त फायद्याचे आहे, असे सांगितले.

वाचा-Jio, Airtel, Vodafone-Idea चे खास रिचार्ज, डेली डेटा संपला तरी वापरा इंटरनेट!

जर तुम्हाला फोन स्वच्छ आणि या विषाणूपासून दूर ठेवायचा असल्यास खालील दिलेल्या पद्धतींचा वापर करून तुम्ही फोन साफ करू शकतो.

वाचा-कोण आहे ‘कोरोना’चा पहिला रुग्ण? ज्याच्यामुळे जगभर पसरला महाभंयकर व्हायरस

>> सर्व प्रथम, तुमचा फोन अनप्लग असेल, याची काळजी घ्या. तसेच, फोनचे कव्हरही काढून टाका.

>> मायक्रोफायबर कापड (नॅपकिन, रुमाल) ओला करा आणि केमिकल फ्री साबणाने फोनची काच साफ करून घ्या. लक्षात ठेवा की साबण थेट फोनच्या स्क्रीनवर लावू नका. साबण पाण्यात मिसळून फोनची स्क्रिन साफ करा.

>> तुमचा फोन वॉटरप्रूफ असला तरीही फोनच्या कोणत्याही ओपनिंगमध्ये पाणी जाणार नाही याची काळजी घ्या.

>> तुमचा फोन क्लिनरमध्ये बुडवण्याची चूक करू नका.

>> फोन ब्लीच करू नका.

>> टिश्यू पेपर वापरणे टाळा. यामुळे फोनच्या स्क्रीनचे नुकसान होऊ शकते.

>> कोणत्याही प्रकारचे स्प्रे वापरू नका. त्याच्या ओलावामुळे फोन खराब होऊ शकतो.

>> फोन कंपन्यांचे म्हणणे आहे की फोन स्वच्छ करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे केमिकल वापरु नका आणि फक्त मायक्रोफायबर कपडा वापरा.

वाचा-कोरोनापासून बचावासाठी 'मास्क'चा जुगाड! पाहा ‘हा’ व्हिडीओ

First published:
top videos

    Tags: Corona