मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Jio, Airtel, Vodafone-Idea चे खास रिचार्ज, डेली डेटा संपला तरी वापरा इंटरनेट!

Jio, Airtel, Vodafone-Idea चे खास रिचार्ज, डेली डेटा संपला तरी वापरा इंटरनेट!

टेलिकम्युनिकेशन कंपन्यांकडून देण्यात येणारा डेली डेटा संपला तर इंटरनेट बंद होतं. त्यासाठी Jio, Airtel, Vodafone-Idea चे खास प्लॅन आहेत.

  • Published by:  Suraj Yadav
मुंबई, 14 मार्च : टेरिफ रिचार्जचे दर वाढल्यानंतर ग्राहकांना आकर्षित कऱण्यासाठी कंपन्यांकडून अनेक ऑफर दिल्या जात आहे. यात फ्री व्हॉइस कॉलसह डेटाही दिला जात आहे. अनेक प्लॅनमध्ये इंटरनेट डेटा जास्त देण्याची ऑफर आहे. मात्र हा डेटाही इंटरनेट जास्त वापरल्यानं संपतो. डेटा दिवसाच्या सुरुवातील किंवा मधेच संपला तर पुन्हा उरलेल्या दिवसात इंटरनेट वापरता येत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत कंपन्यांनी युजर्ससाठी काही प्लॅन ऑफर केले आहेत. एअरटेलनं 48 आणि 98 रुपयांचा डेटा ओनली प्लॅन लाँच केला आहे. जर तुमचा दररोजचा डेटा संपला तर हा रिचार्ज करू शकता. एअरटेच्या 48 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सना 28 दिवसांसाठी 3 जीबी डेटा मिळतो. तर 98 रुपयांच्या प्लॅनमध्ये 6 जीबी डेटा 28 दिवसांसाठी मिळतो. त्यामुळे डेली डेटा संपल्यानंतर यातील डेटा सुरु राहून तुम्हाला इंटरनेट वापरता येतं. व्होडाफोन आयडियानेसुद्धा या समस्येवर त्यांच्या ग्राहकांसाठी 16 रुपयांचा रिचार्ज दिला आहे. यात ग्राहकांना 1 जीबी डेटा मिळते. मात्र याची वैधता फक्त एक दिवस असते. तर दुसरा प्लॅन 48 रुपयांत 3 जीबी डेटा मिळतो आणि 98 रुपयांत 6 जीबी डेटा दिला जातो. यासाठी 28 दिवसांची मुदत आहे. हे वाचा : चार जणांसाठी एकच रिचार्ज, 150 जीबी डेटासह अनलिमिटेड कॉलिंग याबाबतीत रिलायन्स जिओच्या 11 रुपायांच्या प्लॅनमध्ये 400 एमबी डेटा मिळतो. मुदत संपेपर्यंत तो वापरता येतो. याशिवाय 21 रुपयांत 1 जीबी आणि 51 रुपयांत 3 जीबी डेटा मिळतो. हा रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला सध्याच्या प्लॅनची मुदत संपेपर्यंत वापरता येतो. जिओच्या 101 रुपयांच्या प्लॅनवर 6 जीबी डेटा तर 251 रुपयांच्या प्लॅनवर 102 जीबी डेटा मिळतो. या प्लॅनची मुदत 51 दिवस इतकी आहे. हे वाचा : डेटासाठी बंपर ऑफर, 247 रुपयांच्या रिचार्जवर दररोज 3 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉल
First published:

Tags: Internet

पुढील बातम्या